बुधवार, २३ मे, २०१२

ढोर समाजाचा इतिहास

गेल्या ब्लॉग मध्ये संजय सोनवणी यांच्या '......ढोर समाजाचा इतिहास' लेखाबद्दल लिहिले होते. त्यास फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. त्यांच्या या लेखाला कॉमेंट देवून तो लेख माझ्या ब्लॉगवर टाकण्याची परवानगी मागितली होती. ती त्यांनी लगेचच देवून मनाचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा हा लेख लवकरच 'दैनिक नवशक्ती'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या पुढील लिखाणाला हार्दिक शुभेच्छा. तो लेख पुढे दिलेला आहे :


ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास
- संजय सोनवणी

हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक

मंगळवार, २२ मे, २०१२

'संजय सोनवणी' यांचा 'ढोर समाजा'वर माहितीपूर्ण लेख

'संजय सोनवणी' यांचा अल्प परिचय :
मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक. तत्वज्ञ, कवि आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलुंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भुमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. (अधिक वाचा)

संजय सोनवणी हे जून 2010 पासून 'संजय सोनवणी (Sanjay Sonawani)' हा ब्लॉग नियमित लिहितात. यांच्या ब्लॉगवर 10 एप्रिल 2012 रोजी  'ढोर समाजा'वर अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. तो समाजातील प्रत्येकाने वाचला पाहिजे असे मला वाटते. त्या लेखाची  लिंक खाली दिली आहे :

रविवार, २० मे, २०१२

‘लिडकॉम’ची 'बीज भांडवल योजना'

‘लिडकॉम’ (LIDCOM) ची 'बीज भांडवल योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.

बीज भांडवल योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू.50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मिळू शकते. महामंडळ प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 20 टक्‍के बीज कर्ज म्‍हणून

‘लिडकॉम’ची '50% अनुदान योजना'

‘लिडकॉम’ (LIDCOM) ची '50% अनुदान योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.

50% अनुदान योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू. 50000/- कर्ज मिळू शकते व या अर्थसहाय्यापैकी रू. 10000/- कमाल मर्यादेपर्यंत 50% कर्जाची रक्कम

शनिवार, १९ मे, २०१२

‘लिडकॉम’ची 'मुदत कर्ज योजना'

लिडकॉम(LIDCOM) ची 'मुदत कर्ज योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांसअॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

मुदत कर्ज योजना
 
उद्देश :
महामंडळामार्फत, राष्‍ट्रीय अनुसूचित जाती वित्‍त व विकास महामंडळ (NSFDC), नवी दिल्‍ली या महामंडळाच्‍या केंद्र पुरस्‍कृत योजनांचा लाभ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्‍या लाभार्थ्‍यांना देण्‍यात येतो. या अंतर्गत चर्मकार

'लिडकॉम’ची 'सुक्ष्‍म पत पुरवठा योजना'

लिडकॉम(LIDCOM) ची 'सुक्ष्‍म पत पुरवठा योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्डकास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

सुक्ष्‍म पत पुरवठा योजना

उद्देश :
या योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील चर्मकार समाजातील लाभार्थ्‍यांना 5 टक्‍के व्‍याज दराने रु.25,000/- पर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते. या रकमेमध्‍ये 50 टक्‍के किंवा रु.10,000/- यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाते व

बुधवार, १६ मे, २०१२

'लिडकॉम'ची 'महिला समृध्दी योजना'

लिडकॉम(LIDCOM) ची 'महिला समृध्‍दी योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना
'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

महिला समृध्दी योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील विधवा, परित्‍यक्‍ता महिला अथवा ज्‍या गावात राष्‍ट्रीयकृत बँका नाही अशा गावावतील महिला लाभार्थींसाठी महिला समृध्‍दी योजनेअंतर्गत कर्ज रक्‍कम रु. १५,०००/- व अनुदान रु. १०,०००/- असे दोन्‍ही मिळून

'लिडकॉम'ची 'प्रशिक्षण योजना'

लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित चर्मकार समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवते. त्यांची थोडक्यात माहिती या ब्लॉगद्वारे क्रमाक्रमाने प्रसिद्ध करणार आहे.

या ब्लॉगमध्ये आपण 'लिडकॉम'तर्फे राबवल्या जाणाऱ्या 'प्रशिक्षण योजने'संबंधी माहिती घेवू.

प्रशिक्षण योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील लाभधारकांना व्‍यवसायासाठी लागणारे तांत्रिक

चर्मोद्योग आणि चर्मकार समाजाच्या विकासासाठी : 'लिडकॉम'

लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच महाराष्‍ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ (Leather Industries Development Corporation of Maharashtra). हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. आता या महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्‍यात आले आहे. चर्मकार समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या या महामंडळाविषयी थोडक्यात प्रस्तावना :

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्‍या सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच राज्‍यात चर्मोद्योगाचा विकास करण्‍यासाठी शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाची स्‍थापना ०१ मे १९७४ रोजी झालेली आहे.राज्‍यात चर्मोद्योग विकासास चालना देणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान

मंगळवार, १५ मे, २०१२

लातूर मंडळातर्फे नि:शुल्क वधु-वर नोंदणी

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने वधु-वर नोंदणीचे कार्य हाती घेण्यात आले आहे. वधु-वर नाव नोंदणी नि:शुल्क होणार आहे. यासाठी इच्छुक वधु-वरांनी आपली सर्व माहिती (नाव, पत्ता, फोन नंबर, जन्मतारीख, उंची, लिंग, शिक्षण, नोकरी, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ई.) आणि पोस्टकार्ड आकाराच्या फोटो सह मंडळाचे विश्वस्त अॅड. श्री. बाळासाहेब कटके आणि श्री. दिगंबर खरटमोल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अधिक माहितीसाठी