श्री. सुखदेव नारायणकर, सांगली यांचा 'गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची' हा लेख 'संत कक्कय्या पत्रिके'च्या 2011 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. दिवाळी अंकाच्या रूपाने काही लोकांच्या वाचण्यात आलेला हा लेख श्री. विलास व्हटकर यांनी ई-मेलच्या माध्यमातून सार्वत्रिक केला. हा लेख समाजाच्या संघटनात्मक बांधणीचा मसुदा आपल्यापुढे सादर करतो. समाजातील सर्वांनी वाचवा असाच हा लेख आहे. त्यामुळे तो ब्लॉगवर टाकण्याची परवानगी श्री. सुखदेव नारायणकर यांना मागितली आणि त्यांनी ती लगेच दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आता हा लेख कायमस्वरूपी राहील आणि सर्वांना वाचता येईल. लेखावर (टिप्पणी मध्ये) प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. तसेच समाजबांधवांकडून समाजासाठी उपयुक्त लेख आल्यास त्यांचाही लेख त्यांच्या नावासकट या ब्लॉगवर टाकण्यात येईल.
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, १० जुलै, २०१२
बुधवार, २३ मे, २०१२
ढोर समाजाचा इतिहास
गेल्या ब्लॉग मध्ये संजय सोनवणी यांच्या '......ढोर समाजाचा इतिहास' लेखाबद्दल लिहिले होते. त्यास फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. त्यांच्या या लेखाला कॉमेंट देवून तो लेख माझ्या ब्लॉगवर टाकण्याची परवानगी मागितली होती. ती त्यांनी लगेचच देवून मनाचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा हा लेख लवकरच 'दैनिक नवशक्ती'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या पुढील लिखाणाला हार्दिक शुभेच्छा. तो लेख पुढे दिलेला आहे :
हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक
ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास
- संजय सोनवणी
हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक
मंगळवार, २२ मे, २०१२
'संजय सोनवणी' यांचा 'ढोर समाजा'वर माहितीपूर्ण लेख
'संजय सोनवणी' यांचा अल्प परिचय :
मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक. तत्वज्ञ, कवि आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलुंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भुमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. (अधिक वाचा)
संजय सोनवणी हे जून 2010 पासून 'संजय सोनवणी (Sanjay Sonawani)' हा ब्लॉग नियमित लिहितात. यांच्या ब्लॉगवर 10 एप्रिल 2012 रोजी 'ढोर समाजा'वर अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. तो समाजातील प्रत्येकाने वाचला पाहिजे असे मला वाटते. त्या लेखाची लिंक खाली दिली आहे :शुक्रवार, २ मार्च, २०१२
उचल्यांची 'उचलेगिरी'
वाचकहो,
काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉग वरच्या पूर्वीच्या लेखातले काही शब्दसंच गुगलवर टाकून टाईमपास करत असताना एक लिंकच्या माहितीत माझ्या ब्लॉग वरच्या काही ओळी जशाच्या तशा दिसल्या. कुतूहल म्हणून त्या लिंक उघडून पहिले असता ओळीच नाही तर पूर्ण ब्लॉगच्या ब्लॉग जशेच्या तशे उचलले आहेत. त्यामध्ये फॉन्ट साईझ बदलायची तसदी सुद्धा घेतलेली नाही. नुसती स्टाईलच नाही तर शीर्षकेही जशीच्या तशी उचलली आहेत. हे लिखाण स्वतःचे आहे असे भासवण्यासाठी त्याने ब्लॉग वरच्या माहितीचे डॉक्युमेंट मध्ये रुपांतर करून, त्यावर स्वतःच्या नावाचे लेबल लावून गुगलवर उपलोड केले आहे आणि त्याची डॉक्युमेंटची लिंक स्वतःच्या ब्लॉगवर दिली आहे.

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११
'संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान'ला हार्दिक शुभेच्छा !!!
गरीब, होतकरू आणि आर्थिक दुर्बल विद्यर्थ्यांना
शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या 'संत कक्कय्या विद्यार्थी
कल्याण प्रतिष्ठान'च्या मुंबई कार्यालयाचे गुरुवार, दिनांक २०/१०/२०११ रोजी उद्घाटन झाले. दोन दिवस आधी अध्यक्ष श्री.
सोनकवडेंनी समाजातील प्रतिष्ठित लोकांना sms करून यायचे
निमंत्रण पाठवले होते. उद्घाटनाला उपस्थित राहिलेल्या समाज बांधवात माजी आमदार डॉ.
श्रीमती प्रभा गंगाधर शिंदे, माजी आमदार श्री. धर्माजी
गिर्जाप्पा सोनकवडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका
श्रीमती रुक्मिणी विठ्ठलराव खरटमल, त्यांचे पती आणि
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. विठ्ठलराव अंबाजी खरटमल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. महेश भारत तपासे, वाशी (नवी मुंबई) समाज मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. पुंडलिक अंबाजी खरटमल,
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त श्री. शांताराम शामराव शिंदे, वीरशैव संत कक्कय्या युवा ट्रस्ट (कुर्ला) चे अध्यक्ष
शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११
पत्र लिहिण्यामागचा उद्देश
परवा लिहिलेल्या ब्लॉगवरील पत्राचा उद्देश केवळ मंडळांची प्रसिद्धी, वधू-वर पुस्तिकेचा खर्च वाचवणे किंवा घरबसल्या वधू-वर यादी पाहता येणे यापुरताच मर्यादित नाही तर समाजाचा पैसा विधायक कार्यासाठी वळवणे हा आहे.
आज कितीतरी समाजबांधव शिक्षणाविना, मार्गदर्शनाअभावी योग्य प्रकारचे शिक्षण घेऊ शकत नाहीत की योग्य व्यवसाय निवडू शकत नाही. जगात घडणाऱ्या विविध संधींचा फायदा अजूनही आपला समाज घेऊ शकत नाही किंबहुना आपण या संधी शोधूच शकत नाही असे म्हणणे योग्य होईल. कारण काहीही असो त्या खोलात मला आता जायचे नाही. पण यापुढेही आपण असेच झापड लावून जगणार आहोत का? कित्येक शासकीय आणि खाजगी संस्था आर्थिक दुर्बल, पिचलेल्या समाजाला उभारी देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत, याची आपल्याला साधी जाणीवही नाही. आजही मी, माझे कुटुंब

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११
वधु-वर मेळावे घेणाऱ्या मंडळांना लिहिलेले एक पत्र
माझे वडील डॉ. श्री. मधुकर मारुती सोनवणे यांनी वधु-वर मेळावे घेणाऱ्या ८-९ मंडळांना ७ मे २०११ रोजी लिहिलेले एक पत्र.
विषय : मंडळाची माहिती इंटरनेटवर टाकणे बाबत.
माननीय महोदय,
गेली अनेक वर्षे आपले मंडळ वधु-वर मेळाव्यांच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम उत्तमरीत्या करीत आहात, हे पाहून आनंद होत आहे. आपल्या या समाजकार्याला माझा थोडाफार हातभार लागावा या हेतूने हा पत्रव्यवहार करत आहे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)