शनिवार, १९ मे, २०१२

‘लिडकॉम’ची 'मुदत कर्ज योजना'

लिडकॉम(LIDCOM) ची 'मुदत कर्ज योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांसअॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.

मुदत कर्ज योजना
 
उद्देश :
महामंडळामार्फत, राष्‍ट्रीय अनुसूचित जाती वित्‍त व विकास महामंडळ (NSFDC), नवी दिल्‍ली या महामंडळाच्‍या केंद्र पुरस्‍कृत योजनांचा लाभ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्‍या लाभार्थ्‍यांना देण्‍यात येतो. या अंतर्गत चर्मकार
समाजाच्‍या लोकांना त्‍यांनी निवडलेल्‍या कोणत्‍याही स्‍वयं-रोजगारासाठी कर्ज देण्‍यात येते.

शैक्षणिक पात्रता : आवश्यकता नाही 

वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे 

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न :
ग्रामीण भागासाठी - रु.40,000/- आणि शहरी भागासाठी - रु.55,000/- 

NSFDC चा सहभाग व व्याजदर :
प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 90% आणि NSFDC च्‍या रु.5,00,000/- पर्यंतच्‍या सहभागावर द.सा.द.शे. 7 टक्‍के दराने व रु.5,00,000/- पर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज आकारले जाते. 

महामंडळाचा सहभाग व व्‍याजदर :
रु.1,00,000/- पर्यंतच्‍या प्रकल्‍प गुंतवणुकसाठी 10%
रु.1,00,000/- ते रु.2,50,000/- पर्यंतच्‍या प्रकल्‍प गुंतवणुकसाठी 8%
रु.2,50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंतच्‍या प्रकल्‍प गुंतवणुकसाठी 7%
रु.5,00,000/- पेक्षा जास्‍त प्रकल्‍प गुंतवणुकसाठी 5%
 

अर्जदाराचा सहभाग :
रु.1,00,000/- पर्यंतच्‍या प्रकल्‍प गुंतवणुकसाठी अर्जदाराची गुंतवणूक आवश्‍यक नाही
रु.1,00,000/- ते रु.2,50,000/- पर्यंतच्‍या प्रकल्‍प गुंतवणुकसाठी 2%
रु.2,50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंतच्‍या प्रकल्‍प गुंतवणुकसाठी 3%
रु.5,00,000/- पेक्षा जास्‍त प्रकल्‍प गुंतवणुकसाठी 5%
 

हमी : दोन सरकारी नोकरदारांचे हमीपत्र 

इतर अटी :
1.  अर्जदार महाराष्‍ट्र राज्‍याचा कायम रहिवाशी असावा.
2.  अर्जदाराने अन्‍य शासकीय संस्‍थांकडून अनुदान घेतलेले नसावे व तो कोणत्‍याही संस्‍थेचा थकबाकीदार नसावा.
3.  अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असावा.
4.  अर्जदाराने सादर केलेला जातीचा व उत्‍पन्‍नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला असावा. 

कर्जाची परतफेड :
तिमाही / सहामाही हप्‍त्‍यांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त विलंबासह 5 वर्षे. 

अर्ज करण्‍याची कार्यपध्‍दती :
कर्ज प्रकरणाच्‍या जलद निपटा-यासाठी अर्जदाराने प्रथम ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्जान्‍वये प्राप्‍त झालेला Provisional No. आपल्‍या अर्जात नमूद करुन अर्ज आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह नजिकच्‍या महामंडळाच्‍या कार्यालयात सादर करण्‍यात यावा.

आवश्‍यक कागदपत्रं :
1.  तहसिलदार यांनी दिलेला जातीचा दाखला,
2.  तहसिलदार यांनी दिलेला उत्‍पन्‍नाचा दाखला,
3.  अर्जदारास व्‍यवसाय करण्‍यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिकेचा ना-हरकतपरवाना अथवा दुकाने अधिनियमाखालील परवाना,
4.  अर्जदारास ज्‍या ठिकाणी व्‍यवसाय करावयाचा असेल त्‍या जागेच्‍या उपलब्‍धतेचा पुरावा किंवा भाड्याचे करारपत्र,
5.  प्रकल्‍प अहवाल,
6.  प्रस्‍तावित उद्योग / व्‍यवसायाकरीता आवश्‍यक परवाना,
7.  शिधापत्रिकेची छायाप्रत सत्‍यप्रत,
8.  अर्जदाराने यापुर्वी शासकीय योजनेतून कर्ज व अनुदान घेतले नाही, तसेच सदरचे कर्ज मंजूर झाल्‍यावर ते वेळेवर परतफेड करण्‍याची हमीपत्र / प्रतिज्ञापत्र रु.20 / रु.50 स्‍टॅम्‍प पेपरवर नोटरी / अफीडेव्‍हीट सह,
9.  दोन शासकीय / निम-शासकीय जामिनदार. जामीनदारांच्‍या कार्यालयाचे हमीपत्र, जामिनदारांचे प्रतिक्षापत्र,
10. अर्जदाराच्‍या शेतकरी / प्रॉब्लम जामीनदाराने कर्ज फेडीबाबत सात/बारा किंवा प्रॉपर्टी कार्ड चा उतारा व त्‍यावर कर्जाचा बोजा चढविण्‍याचे व अर्जदाराने वेळेवर कर्ज न फेडल्‍यास ते फेडण्‍याबाबत रु.20 / रु.50 च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर हमीपत्र नोटरीसह,
11. अर्जदाराने कर्जाची परतफेड नियमीत न केल्‍यास जामीनदार कर्जाची परतफेड करील याबाबत रु.20 / रु.50 स्‍टॅम्‍प पेपरवर प्रतिज्ञापत्र नोटरीसह,
12. अर्जदारास जो व्‍यवसाय करावयाचा आहे त्‍याबाबत तांत्रिक ज्ञानाचे प्रमाणपत्र,
13. अर्जदारास व्‍यवसायाचा प्रत्‍यक्ष अनुभव असल्‍याचा पुरावा,
14. शैक्षणिक दाखला,
15. कच्‍च्‍यामालाचे कोटेशन,
16. अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असल्‍याचा दाखला व क्रमांक. 

1 टिप्पणी:

  1. माझा व्यवसाय कल्याण ला आहे,

    मला मोठा करायचा आहे,

    काय मदत करू शकाल आपण?

    Reply apekshit aahe.....


    Thanks
    Yogesh arjun narayankar
    9029884535

    उत्तर द्याहटवा