शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

"ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण

जालन्याच्या श्रीमती भारती शिवलिंगराव खरटमल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सर्व समाजबांधवांना उपरोक्त विषयासंबंधी केलेले आवहन.

सर्व समाजबांधवांना नमस्कार,
मी भारती शिवलिंगराव खरटमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी राहणार मुळ जालना. आमच्या संस्थेमार्फत "ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण पुर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी विविध ठिकाणांहून माहिती मी संकलित करत आहे.

मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२

श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांचे समाजबांधवांना आवाहन

विधायक कार्यासाठी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेचे व ई-मेल पत्ते गोळा करण्याचे काम श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई (मोबाईल नं. ०९८६९३८८३०३), यांनी हाती घेतले आहे. नोव्हेंबर १७, २०१२ पर्यंत त्यांच्याकडे बरयाच लोकांचे जनगणनेचे फॉर्म व ७६५ लोकांचे ई-मेल पत्ते गोळा झाले आहेत. श्री. व्हटकर यांच्या कडून सर्व समाजबांधवाना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेसाठी व ई-मेल पत्त्यासाठी श्री. व्हटकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
 
पत्ताः
श्री. विलास नामदेवराव व्हटकर,
चारकोप सरगम सह. गृह. संस्था मर्यादित,

गुरुवार, २६ जुलै, २०१२

असे मिळते जात प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा महत्त्वाच्या वेळेला या प्रमाणपत्राची मागणी होते आणि नेमके हे प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध नसते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रमाणपत्राची आणि विशेषत: निवडणुकीच्या काळातही या प्रमाणपत्राची विशेष आवश्यकता भासते.

हे प्रमाणपत्र कसे मिळविले जाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे करायचा, प्रमाणपत्राची पडताळणी म्हणजे काय याविषयीची माहिती खास वाचकांसाठी...

मंगळवार, २४ जुलै, २०१२

योजना आपल्या दारी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. 

गरीब विद्यर्थ्यांसाठी पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती. 

गरीब मुलींसाठी 3 महिन्यांचा मोफत 'डिप्लोमा ट्रॅव्हल व टुरिझम' अभ्यासक्रम. 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आणि स्त्रियांसाठी IDEMI तर्फे होणारा अभ्यासक्रम सवलतीमध्ये.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.