गुरुवार, २९ मार्च, २०१२

नाशिक येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन

वीरशैव कंकय्या डोहार समाज मंडळ, नाशिक यांनी रविवार, ०१ एप्रिल २०१२ रोजी 'श्रद्धा' लॉन, गाडगे महाराज पुलाजवळ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याबद्दल अधिकच्या माहितीबद्दल 

सोमवार, ५ मार्च, २०१२

दिनोदिन बढता जाये कारोबार - २

गेला 'दिनोदिन बढता जाये कारोबार' ब्लॉग लिहून ३ महिने झाले. या ३ महिन्यात बरेच बदल घडले. यादरम्यान श्री. रमाकांत नारायणे यांनी पाठवलेल्या 'कक्कय्या समाज परिचय' ला ब्लॉगवर टप्या-टप्प्याने प्रसिद्धी देण्यात आली. तसेच विविध ठिकाणी होणाऱ्या वधू-वर मेळाव्यांच्या तारखा मंडळांच्या संपर्क क्रमांकासह  ब्लॉगवर देण्यात आले. सर्वच ब्लॉगला समाजबांधवांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या ३ महिन्यात २७२५ वाचकांनी ब्लॉगला भेटी दिल्या. म्हणजे रोज सरासरी ३० लोक हा ब्लॉग वाचत आहेत. तसेच या ब्लॉगची सदस्य संख्या 

शुक्रवार, २ मार्च, २०१२

उचल्यांची 'उचलेगिरी'

वाचकहो,

काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉग वरच्या पूर्वीच्या लेखातले काही शब्दसंच गुगलवर टाकून टाईमपास करत असताना एक लिंकच्या माहितीत माझ्या ब्लॉग वरच्या काही ओळी जशाच्या तशा दिसल्या. कुतूहल म्हणून त्या लिंक उघडून पहिले असता ओळीच नाही तर पूर्ण ब्लॉगच्या ब्लॉग जशेच्या तशे उचलले आहेत. त्यामध्ये फॉन्ट साईझ बदलायची तसदी सुद्धा घेतलेली नाही. नुसती स्टाईलच नाही तर शीर्षकेही जशीच्या तशी उचलली आहेत. हे लिखाण स्वतःचे आहे असे भासवण्यासाठी त्याने ब्लॉग वरच्या माहितीचे डॉक्युमेंट मध्ये रुपांतर करून, त्यावर स्वतःच्या नावाचे लेबल लावून गुगलवर उपलोड केले आहे आणि त्याची डॉक्युमेंटची लिंक स्वतःच्या ब्लॉगवर दिली आहे.