लिडकॉम’ (LIDCOM) ची 'महिला समृध्दी योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना
'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
महिला समृध्दी योजना
चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता महिला अथवा ज्या गावात राष्ट्रीयकृत बँका नाही अशा गावावतील महिला लाभार्थींसाठी महिला समृध्दी योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु. १५,०००/- व अनुदान रु. १०,०००/- असे दोन्ही मिळून
रु. २५,०००/- पर्यंत ४% व्याज दराने कर्ज देण्यात येते.
अटी :
1. महिला समृध्दी योजनेअंतर्गत महिला लाभार्थींनी पूर्ण
कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मंजुरी देण्यात येते.2. कर्जाचा व्याजाचा दर द.सा.द.शे. ४% असून त्याची वसूली ३६ हप्त्यांमध्ये करण्यात येईल.
3. लाभार्थींकडून एक सक्षम जामिनदार घेण्यात येईल.
4. सदर योजनेअंतर्गत १००% महिला लाभार्थींनाच लाभ द्यावयाचा असून प्रामुख्याने विधवा व परित्यक्ता यांनाच प्राधान्य देण्यात येते.
5. एकूण उद्दिष्टापैकी ५०% कर्ज प्रस्ताव,कृषी व कृषीवर आधारित व्यवसायाकरिता, ४०% सेवेकरिता व १०% कारखानदारीवर आधारित व्यवसायांच्या कर्ज प्रस्तावांना मंजूरी देण्यात येते.
6. कर्ज मंजूरीची मर्यादा रु. २५,०००/- पर्यंत आहे.
निकष :
1. चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता महिलांना प्राधान्य देण्यात येते.2. ज्या गावात राष्ट्रीयकृत बॅका नाहीत अशा गावातील महिला लाभार्थींची कर्ज मंजूरी देतांना निवड करण्यात यावी.
3. बीजभांडवल, एनएसएफडीसी योजनेअंतर्गत ज्या गावातील महिला लाभार्थींना फायदा मिळाला नाही अशा गावातील महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.
4. व्यवसायासाठी अत्यंत गरजवंत महिला लाभार्थींची निवड व शिफारस करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापक यांना देण्यात आले आहेत.
5. महामंडळाच्या योजनेतून प्रशिक्षण घेतलेल्या महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.
6. सदर योजनेअंतर्गत १००% महिला लाभार्थींनाच लाभ देण्यात येतो. ज्या लाभार्थींनी यापुर्वी योजनेचा लाभ घेतलेला आहे अश्यांना पुन्हा सदर योजनेचा लाभ देण्यात येत नाही.
पात्रता :
1. अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.2. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
3. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षेमधील असावे.
4. अर्जदार महामंडळाचा, बँकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
5. ग्रामिण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु.39,308 आणि शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ५४,४९४/- यापेक्षा जास्त नसावे.
6. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल.
अर्ज करण्याची कार्यपध्दती :
कर्ज प्रकरणाच्या जलद निपटा-यासाठी अर्जदाराने प्रथम
ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे.ऑनलाईन अर्जान्वये प्राप्त झालेला Provisional No. आपल्या अर्जात नमूद करुन अर्ज आवश्यक त्या
कागदपत्रांसह नजिकच्या महामंडळाच्या कार्यालयात सादर करण्यात यावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा