गुरुवार, २६ जुलै, २०१२

असे मिळते जात प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा महत्त्वाच्या वेळेला या प्रमाणपत्राची मागणी होते आणि नेमके हे प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध नसते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रमाणपत्राची आणि विशेषत: निवडणुकीच्या काळातही या प्रमाणपत्राची विशेष आवश्यकता भासते.

हे प्रमाणपत्र कसे मिळविले जाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे करायचा, प्रमाणपत्राची पडताळणी म्हणजे काय याविषयीची माहिती खास वाचकांसाठी...

·     भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार, संसदेने आणि राज्य शासनाने केलेल्या तरतुदीनुसार जाती आणि जमातींना शिक्षण, रोजगार यामध्ये राखीव जागा ठेवल्या जातात. या राखीव जागांचा लाभ त्या त्या जातीतील विद्यार्थी आणि बेरोजगारांना मिळायला हवा, यासाठी जातीचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. बनावट प्रमाणपत्र देऊन कोणीही गैरफायदा घेऊ नये यासाठी संबंधित जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते.
·    वास्तविक जातीचे प्रमाणपत्र वर्षभर दिले जाते. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करण्याच्यावेळी अथवा प्रवेश घेण्याच्यावेळी जातीचे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यास शासकीय यंत्रणेवर ताण येऊ शकतो. त्याऐवजी गरज लागण्यापूर्वीच जातीचे प्रमाणपत्र घेऊन ठेवणे अधिक फायदेशीर ठरू शकेल.
·    जातीचे प्रमाणपत्र जलदगतीने दिले जावे यासाठी तहसील कार्यालयात सेतू केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रात विहित नमुन्यातील अर्ज, शाळा सोडल्याचा दाखला, वास्तव्याचा पुरावा आदी कागदपत्रे द्यावी लागतात. याचवेळी वीस रुपयांचे शुल्कही द्यावे लागते.
·    जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ते प्रमाणपत्र पडताळणी करून घ्यावे लागते.
·    सध्या राज्यात अठरा जिल्ह्यात अशा समित्यांची कार्यालये आहेत.
·    पडताळणी समितीच्या कामकाजाचा वाढलेला व्याप लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्यात एक समिती स्थापन करण्याचा शासनाचा मानस.
·    जात प्रमाणपत्र पडताळून घेण्यासाठी बरीच कागदपत्रे द्यावी लागतात, असा समज आहे. पण नमूद केलेल्या एकूण कागदपत्रांपैकी आवश्यक कागदपत्रे पुरेशी ठरतात. कटुंबातील एका व्यक्तीची जात पडताळणी झाल्यास ते प्रमाणपत्र कुटुंबातील दुसर्‍या व्यक्तींनी सादर केल्यास अशा अर्जदाराची जात पडताळणी एक महिन्यात केली जाते.
·    बर्‍याचदा वडील, काका, आत्या यांचे जातीचे दाखले मिळत नाहीत. अशावेळी अर्जदाराची खूप अडचण होते. अशा व्यक्तींनी संबंधित समाजाचा दाखला, ग्रामसेवक, गावचे पोलिस पाटील यांचा दाखला सादर केला तरी चालते. जात वडिलांकडून येत असल्याने आईचा जातीचा दाखला ग्राह्य धरला जात नाही.
·    सर्व गटातील जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो.
·    काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात सेतू योजना राबविण्यात आली आहे.
·    अर्ज केल्यानंतर आठ दिवसांत जात प्रमाणपत्र दिले जाते.
·    प्रमाणपत्र मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज द्यावा लागतो, तसेच एक शपथपत्रही सादर करण्याची आवश्यकता असते.
·    जातीचा आणि रहिवासी पुरावा द्यावा लागतो. 

त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी -
·     वडील, भाऊ, बहीण, काका, आत्या, आजोबा यांचा जातीचा दाखला.
·     शाळा सोडल्याचा दाखला.
·     बोनाफाईड दाखला.
·     महसुली अभिलेख (उदा. जन्म, मृत्यू दाखले)
·     समाजाच्या नोंदणीकृत संस्थेचा दाखला.
·     ग्रामीण भागात राहत असल्यास सरपंच, पोलिस पाटील, तलाठी यांचा दाखला.
·      तलाठ्याने केलेल्या गृहचौकशीचा दाखला. 

वास्तव्याच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रे अशी -
·     रेशन कार्ड
·     वीज बिल
·     फोन बिल
·     घरफाळा भरलेली पावती
·     निवडणूक ओळखपत्र
·     मतदारयादीत नाव असल्याचा पुरावा 

जात प्रमाणपत्र आणि पडताळणीतील फरक –
बर्‍याच जणांचा असा समज असतो की, एकदा जात प्रमाणपत्र मिळाले की झाले. आपल्याला सर्व सुविधा सहज मिळतील. पण जातीचे प्रमाणपत्र हे संबंधित अधिकार्‍याने त्यांना सादर केलेला अर्ज, कागदपत्रे यांच्या आधारे दिले जाते.
·    प्रमाणपत्र दिले जात असताना दिलेली कागदपत्रे तपासण्याची यंत्रणा नसते. त्यामुळे प्रमाणपत्र पडताळणी करण्याची गरज असते.
·    नोकरी, महाविद्यालयात प्रवेश, निवडणूक याठिकाणी जात प्रमाणपत्र महत्त्वाचे असते.
·    त्यामुळे जात प्रमाणपत्र खरे आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी समिती असते. ही समिती दिलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करते.
·    एखाद्या अर्जदाराच्या कागदपत्रांबाबत काही शंका आढळल्यास समिती त्याच्या कागदपत्रांबाबत सखोल चौकशी करते.
·    या समितीकडे एक दक्षता पथक असते. या पथकाद्वारे ही समिती चौकशी करते.
·    ही चौकशी विविध प्रकारे केली जाते. त्यात परंपरा, कुलदैवत, रीतीरिवाज, सण, भाषा, वास्तव्याचे ठिकाण अशा विविध बाबींचा आधार घेतला जातो. 

जात पडताळणी समितीची रचना -
·    अनुसूचित जमातीची (शेड्युल्ड ट्राईब्ज) जात पडताळणी आदिवासी विकास विभागाच्या यंत्रणेद्वारे केली जाते.
·    राज्यातील सहा विभागीय ठिकाणी ही समिती आहे.
·    इतर सर्व जातींच्या प्रमाणपत्राची पडताळणी राज्यात पंधरा ठिकाणी असणार्‍या जात पडताळणी समितींमार्फत केली जाते.
·    राज्यात सहा विभागीय ठिकाणी आणि काही जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा बारा तर मुंबई उपनगर, पुणे, नागपूर येथे प्रत्येकी अशा पंधरा ठिकाणी पडताळणी समिती आहे.
·    विभागीय स्तरावरील समितीत विभागीय आयुक्त, विभागीय समाज कल्याण अधिकारी आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी सदस्य असतात. 

प्रमाणपत्र पडताळणीसाठी लागणारा वेळ -
·    अर्जदाराच्या कुटुंबातील एकाचे पडताळणी प्रमाणपत्र जोडले असेल तर अर्जदाराला एका महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र दिले जाते.
·     निवडणुकीसाठी प्रमाणपत्र आवश्यक असल्यास दोन महिन्यांत दिले जाते.
·    जात पडताळणी समितीला काही प्रमाणात न्यायालयीन अधिकार आहेत. समितीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागावी लागते.
·    जात ही वडिलांकडून येत असल्याचे गृहित धरल्याने आई राखीव जातीतील असेल आणि वडील खुल्या वर्गातील असतील तर त्यांच्या अपत्यांना आरक्षणाचे लाभ मिळत नाहीत. 

Source: mahanews.gov.in महाराष्ट्र राज्य शासनाचे  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय  कडून साभार 

७ टिप्पण्या:

  1. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या एका निकालानुसार आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यापैकी आई जर मागासवर्गीय असेल तर अपत्याला आईची जात अंगीकारून तिच्या जातीचे प्रमाणपत्र घेता येईल आणि अर्थातच आरक्षणाचे फायदे घेता येतील. मागास समाजातील आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांना योग्य पुरावे सादर करून आईच्या जातीचे प्रमाणपत्र मिळण्याची संधी दिली पाहिजे, या न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेऊन महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने तसा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांच्या मुलांना आपली आई जर मागासवर्गीय असेल तर ऐच्छिकरीत्या तिची जात लावता येईल. सध्या हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे विचाराधीन आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. I am Suvarna. Thanks for information provided. It is very useful and helpful information.
    But I have an important query about the caste certificate matter....,
    If someone is living in other state...and wants to get the caste certificate issued by the Maharashtra Government...what is the procedure for the same.

    Kindly, provide the information on chinmay3107@gmail.com

    Thanking You,
    -Regards
    Mrs. Suvarna...

    उत्तर द्याहटवा
  3. Majhe naav vidya parshuram shinde me jat padtalni sathi apply kele aahe ani mla khup argntly te have aahe pn mjhe ajoba jynch janmsthan vadgaon j belgaon mdhe aahe te aslya karnane mla caste validity gavatunch karavi lagel as sangitle aahe pn mjha janm tr mumbaitch zala aani mjhe ajoba 1947 pasun mumbai mde kamala hote tri te mhntat amala tumchya ajobancha rahivasi purava dya 1950 pasun maharashtrat aslycha ata evde june documents kahi bhetle nhi tri mla 1952 che j documents bhetle me submit kele tri suddha mla caste validity dyayla evda vel lavtay college mde application lihun ghetla ahe ki 15 may 2017 parynt nhi dili validity clg mde tr mjh admission cancel kel jaael mhnun plz i need help contact me if possible vidyashinde0111@gmail.com

    उत्तर द्याहटवा