‘लिडकॉम’ (LIDCOM) ची 'सुक्ष्म पत पुरवठा योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्डकास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)'
यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
अटी :
अर्ज करण्याची कार्यपध्दती :
अर्जाच्यानमुन्यासाठी येथे क्लिक करा.
सुक्ष्म पत पुरवठा योजना
उद्देश :
या योजनेअंतर्गत दारिद्रय
रेषेखालील चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना 5 टक्के व्याज दराने रु.25,000/- पर्यंत
अर्थ सहाय्य दिले जाते. या रकमेमध्ये 50 टक्के किंवा रु.10,000/-
यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाते व
उर्वरित रक्कम कर्ज
म्हणून दिली जाते.अटी :
1. सूक्ष्म
पत पुरवठा योजनेअंतर्गत लाभार्थींना पूर्ण कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर
विभागीय अधिका-यांनी उद्दिष्टानुसार मंजूरी द्यावयाची आहे.
2. कर्जाचा
व्याजाचा दर द.सा.द.शे. 5% असून त्याची वसूली 36 समान हप्त्यांमध्ये करण्यात येईल.
3. लाभार्थींकडून
एक सक्षम जामिनदार घेण्यात यावा.
4. एकूण
उद्दिष्टापैकी 50% कर्ज प्रस्ताव, कृषी व कृषीवर आधारित व्यवसायाकरिता, 40% सेवेकरिता
व 10% कारखानदारीवर आधारित व्यवसायांच्या कर्ज प्रस्तावांना
मंजूरी देण्यात येते.
5. कर्ज
मंजूरीची मर्यादा रु. 25,000/- पेक्षा जास्त नाही.
6. सदर
योजनेत 100% वसूलीच्या जबाबदारी विभागीय
अधिकारी व जिल्हा व्यवस्थापकावर राहील.
7. अर्जदार
दारिद्य्र रेषेखालील असावा.
निकष :
1.
चर्मकार सामाजातील निराधार व गरीब व
गरजू लाभार्थ्यांना प्राधान्या देण्यात यावे.
2.
ज्या गावात राष्ट्रीयकृत बॅका नाहीत
अशा गावातील लाभार्थींची कर्ज मंजूरी देतांना निवड करण्यात यावी.
3.
बीजभांडवल, एनएसएफडीसी योजनेअंतर्गत ज्या गावातील लाभार्थींना फायदा मिळाला नाही अशा
गावातील लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.
4.
व्यवसायासाठी अत्यंत गरजवंत लाभार्थींची
निवड व शिफारस करण्याचे अधिकार जिल्हा व्यवस्थापक यांना देण्यात आले आहेत.
5.
महामंडळाच्या योजनेतून प्रशिक्षण
घेतले असल्यास त्या लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.
6.
ज्या लाभार्थींनी यापुर्वी योजनेचा लाभ
घेतलेला आहे अश्यांना पुन्हा सदर योजनेचा लाभ देण्यात येत नाही.
अर्ज करण्याची कार्यपध्दती :
कर्ज प्रकरणाच्या जलद निपटा-यासाठी
अर्जदाराने प्रथम ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्जान्वये प्राप्त
झालेला Provisional No. आपल्या अर्जात नमूद
करुन अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह नजिकच्या महामंडळाच्या कार्यालयात सादर
करण्यात यावा.
अर्जाच्यानमुन्यासाठी येथे क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा