रविवार, २० मे, २०१२

‘लिडकॉम’ची '50% अनुदान योजना'

‘लिडकॉम’ (LIDCOM) ची '50% अनुदान योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.

50% अनुदान योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू. 50000/- कर्ज मिळू शकते व या अर्थसहाय्यापैकी रू. 10000/- कमाल मर्यादेपर्यंत 50% कर्जाची रक्कम
महामंडळ अनुदान म्हणून देते. ही योजना जिल्हा स्तरावर जिल्‍हा व्‍यवस्‍थापकांमार्फत राबविली जाते.

शैक्षणिक पात्रता : आवश्यकता नाही

वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे.

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न :
ग्रामीण भागासाठी - रु.39,308 /- आणि शहरी भागासाठी - रु.54,496/-.

कर्जमर्यादा : कमाल रू.50,000/-.

बँकेचा सहभाग व व्याजदर :
प्रकल्प गुंतवणुकीच्या 50% आणि व्याज बॅकेच्या कर्जावर द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्के दराने.

अर्जदाराचा सहभाग : नाही.

अनुदान : प्रकल्प गुंतवणुकीच्या 50% व कमाल रू.10,000/- मर्यादेत.

हमी : दोन सरकारी नोकरदारांचे हमीपत्र.

तारण : बँकेच्या नियमानुसार

इतर अटी :
अर्जदार महाराष्‍ट्र राज्‍याचा कायम रहिवाशी असावा.
अर्जदाराने अन्‍य शासकीय संस्‍थांकडून अनुदान घेतलेले नसावे व तो कोणत्‍याही संस्‍थेचा थकबाकीदार नसावा.
अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असावा.
अर्जदाराने सादर केलेला जातीचा व उत्‍पन्‍नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला असावा.

कर्जाची परतफेड :
36 ते 60 मासिक हप्‍त्‍यात

अर्ज करण्‍याची कार्यपध्‍दती :
कर्ज प्रकरणाच्‍या जलद निपटा-यासाठी अर्जदाराने प्रथम ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्जान्‍वये प्राप्‍त झालेला Provisional No. आपल्‍या अर्जात नमूद करुन अर्ज आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह नजिकच्‍या महामंडळाच्‍या कार्यालयात सादर करण्‍यात यावा.

आवश्‍यक कागदपत्रं :
1. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला
2. उत्‍पन्‍नाचा दाखला
3. जातीचा दाखला
4. नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो
5. शिधापत्रिकेची छायाप्रत
6. व्‍यवसायासाठी लागणा-या स्‍थावर मालमत्‍तेच्‍या किंमतीचे दरपत्रक
7. अर्जदारास ज्‍या ठिकाणी व्‍यवसाय करावयाचा असेल त्‍या जागेच्‍या उपलब्‍धतेचा पुरावा किंवा भाड्याचे करारपत्र
8. अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असल्‍याचा दाखला व क्रमांक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा