ज्या ठिकाणी शरण कक्कय्या लिंगैक्य झाले त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली आहे. समाधीच्या बाजूस कक्कय्यांचे तळे व कक्कय्यांची विहीर सुद्धा आहे. तेथे कक्कय्यांबाबत माहिती देणारा शिलापट सुद्धा आहे व त्याच ठिकाणी कक्कय्यांच्या नावे 'कक्केरी' (तालुका: खानापूर, जिल्हा: बेळगाव, राज्य: कर्नाटक) हे गाव सुद्धा वसलेले आहे. समाधीच्या स्थळी महाशिवरात्रीस मोठी महायात्रा भरते व लिंगायत समाज व कक्कय्या समाज मोठ्या संखेने महायात्रेस हजर असतो. यावेळी सामुदायिक भोजनाचा मोठा कार्यक्रम होऊन प्रसाद दिला जातो. तेथे आपल्या समाज बांधवांनी एक सभागृह, स्नानगृह, स्वच्छतागृह बांधले असून, पाण्यासाठी बोअरवेल खोदली आहे आणि एक जंगम पुजारीही तेथे ठेवला आहे. तेथेच कक्कय्यांच्या पत्नी 'भिष्ठादेवीही' लिंगैक्य झाल्या व त्यांचे मंदिरही
गावात आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कक्केरीस अपल्या समाजाची एकही व्यक्ती राहत नाही.
गावात आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे कक्केरीस अपल्या समाजाची एकही व्यक्ती राहत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा