गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५
शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३
"ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण
जालन्याच्या
श्रीमती भारती
शिवलिंगराव खरटमल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत
आहेत. त्यांनी सर्व समाजबांधवांना उपरोक्त विषयासंबंधी केलेले आवहन.
सर्व
समाजबांधवांना नमस्कार,
मी भारती शिवलिंगराव खरटमल, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी राहणार मुळ जालना. आमच्या
संस्थेमार्फत "ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण पुर्ण महाराष्ट्रात केले
जाणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी विविध ठिकाणांहून माहिती मी संकलित करत आहे.
मंगळवार, २० नोव्हेंबर, २०१२
श्री. विलास नामदेवराव व्हटकर यांचे समाजबांधवांना आवाहन
विधायक कार्यासाठी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेचे व ई-मेल पत्ते गोळा
करण्याचे काम श्री. विलास नामदेवराव व्हटकर, मुंबई (मोबाईल नं. ०९८६९३८८३०३), यांनी
हाती घेतले आहे. नोव्हेंबर १७, २०१२ पर्यंत त्यांच्याकडे बरयाच लोकांचे जनगणनेचे
फॉर्म व ७६५ लोकांचे ई-मेल पत्ते गोळा झाले आहेत. श्री. व्हटकर यांच्या कडून सर्व
समाजबांधवाना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी कक्कय्या / ढोर समाजाच्या जनगणनेसाठी
व ई-मेल पत्त्यासाठी श्री. व्हटकर यांना पुढील पत्त्यावर संपर्क साधावा.
पत्ताः
श्री. विलास नामदेवराव व्हटकर,
चारकोप सरगम सह. गृह.
संस्था मर्यादित,
गुरुवार, २६ जुलै, २०१२
असे मिळते जात प्रमाणपत्र
जातीचे
प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा महत्त्वाच्या वेळेला या
प्रमाणपत्राची मागणी होते आणि नेमके हे प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध नसते.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रमाणपत्राची आणि विशेषत: निवडणुकीच्या
काळातही या प्रमाणपत्राची विशेष आवश्यकता भासते.
हे प्रमाणपत्र
कसे मिळविले जाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात,
अर्ज कोठे करायचा, प्रमाणपत्राची पडताळणी
म्हणजे काय याविषयीची माहिती खास वाचकांसाठी...
मंगळवार, २४ जुलै, २०१२
योजना आपल्या दारी
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण.
गरीब विद्यर्थ्यांसाठी पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती.
गरीब मुलींसाठी 3 महिन्यांचा मोफत 'डिप्लोमा ट्रॅव्हल व टुरिझम' अभ्यासक्रम.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आणि स्त्रियांसाठी IDEMI तर्फे होणारा अभ्यासक्रम सवलतीमध्ये.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
गरीब विद्यर्थ्यांसाठी पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती.
गरीब मुलींसाठी 3 महिन्यांचा मोफत 'डिप्लोमा ट्रॅव्हल व टुरिझम' अभ्यासक्रम.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आणि स्त्रियांसाठी IDEMI तर्फे होणारा अभ्यासक्रम सवलतीमध्ये.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.
मंगळवार, १० जुलै, २०१२
गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची
श्री. सुखदेव नारायणकर, सांगली यांचा 'गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची' हा लेख 'संत कक्कय्या पत्रिके'च्या 2011 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. दिवाळी अंकाच्या रूपाने काही लोकांच्या वाचण्यात आलेला हा लेख श्री. विलास व्हटकर यांनी ई-मेलच्या माध्यमातून सार्वत्रिक केला. हा लेख समाजाच्या संघटनात्मक बांधणीचा मसुदा आपल्यापुढे सादर करतो. समाजातील सर्वांनी वाचवा असाच हा लेख आहे. त्यामुळे तो ब्लॉगवर टाकण्याची परवानगी श्री. सुखदेव नारायणकर यांना मागितली आणि त्यांनी ती लगेच दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आता हा लेख कायमस्वरूपी राहील आणि सर्वांना वाचता येईल. लेखावर (टिप्पणी मध्ये) प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. तसेच समाजबांधवांकडून समाजासाठी उपयुक्त लेख आल्यास त्यांचाही लेख त्यांच्या नावासकट या ब्लॉगवर टाकण्यात येईल.
शुक्रवार, १५ जून, २०१२
लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
लातूर येथील ज्योतिबा फुले बहुउद्देशीय
सेवाभावी संस्थेच्या वतीने ढोर समाजाच्या वधु-वरांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे
रविवार, 24 जून 2012 रोजी,
दुपारी 12:39 वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या
समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी
नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे
वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी
कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि
बुधवार, १३ जून, २०१२
दिनोदिन बढता जाये कारोबार - ३
गेल्या ३ महिन्यात कार्यबाहुल्यामुळे जास्त लिखाण होऊ शकले नाही. या दरम्यान लातूर आणि नाशिक मंडळांचे कार्यक्रम, 'लिडकॉम' (LIDCOM) संस्थेची माहिती आणि संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, तसेच संजय सोनवणी यांचा ढोर समाजाबद्दल माहितीपूर्ण लेख ई. ब्लॉग टाकण्यात आले. तरीही वाचकसंख्या टिकून राहिली यातच ब्लॉगचे यश सामावले आहे.
बुधवार, २३ मे, २०१२
ढोर समाजाचा इतिहास
गेल्या ब्लॉग मध्ये संजय सोनवणी यांच्या '......ढोर समाजाचा इतिहास' लेखाबद्दल लिहिले होते. त्यास फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. त्यांच्या या लेखाला कॉमेंट देवून तो लेख माझ्या ब्लॉगवर टाकण्याची परवानगी मागितली होती. ती त्यांनी लगेचच देवून मनाचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा हा लेख लवकरच 'दैनिक नवशक्ती'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या पुढील लिखाणाला हार्दिक शुभेच्छा. तो लेख पुढे दिलेला आहे :
हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक
ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास
- संजय सोनवणी
हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक
मंगळवार, २२ मे, २०१२
'संजय सोनवणी' यांचा 'ढोर समाजा'वर माहितीपूर्ण लेख
'संजय सोनवणी' यांचा अल्प परिचय :
मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक. तत्वज्ञ, कवि आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलुंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भुमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. (अधिक वाचा)
संजय सोनवणी हे जून 2010 पासून 'संजय सोनवणी (Sanjay Sonawani)' हा ब्लॉग नियमित लिहितात. यांच्या ब्लॉगवर 10 एप्रिल 2012 रोजी 'ढोर समाजा'वर अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. तो समाजातील प्रत्येकाने वाचला पाहिजे असे मला वाटते. त्या लेखाची लिंक खाली दिली आहे :रविवार, २० मे, २०१२
‘लिडकॉम’ची 'बीज भांडवल योजना'
‘लिडकॉम’ (LIDCOM) ची 'बीज भांडवल योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.
बीज भांडवल योजना
उद्देश
:
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक
व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील
दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू.50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मिळू
शकते. महामंडळ प्रकल्प गुंतवणुकीच्या 20 टक्के बीज कर्ज म्हणून
‘लिडकॉम’ची '50% अनुदान योजना'
‘लिडकॉम’ (LIDCOM) ची '50% अनुदान योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.
50% अनुदान योजना
उद्देश :
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत
पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार
समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू. 50000/- कर्ज मिळू शकते व या
अर्थसहाय्यापैकी रू. 10000/- कमाल मर्यादेपर्यंत 50% कर्जाची रक्कम
शनिवार, १९ मे, २०१२
‘लिडकॉम’ची 'मुदत कर्ज योजना'
‘लिडकॉम’ (LIDCOM) ची 'मुदत कर्ज योजना'
ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांसअॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
मुदत कर्ज योजना
उद्देश :
महामंडळामार्फत, राष्ट्रीय
अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC), नवी दिल्ली
या महामंडळाच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा लाभ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या
लाभार्थ्यांना देण्यात येतो. या अंतर्गत चर्मकार
'लिडकॉम’ची 'सुक्ष्म पत पुरवठा योजना'
‘लिडकॉम’ (LIDCOM) ची 'सुक्ष्म पत पुरवठा योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना 'नॅशनल शेड्यूल्डकास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)'
यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
सुक्ष्म पत पुरवठा योजना
उद्देश :
या योजनेअंतर्गत दारिद्रय
रेषेखालील चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना 5 टक्के व्याज दराने रु.25,000/- पर्यंत
अर्थ सहाय्य दिले जाते. या रकमेमध्ये 50 टक्के किंवा रु.10,000/-
यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाते वबुधवार, १६ मे, २०१२
'लिडकॉम'ची 'महिला समृध्दी योजना'
लिडकॉम’ (LIDCOM) ची 'महिला समृध्दी योजना' ही केंद्र पुरस्कृत योजना
'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
'नॅशनल शेड्यूल्ड कास्ट्स फाईनांस अॅन्ड डेवलपमेंट कार्पोरेशन (एन एस एफ डी सी)' यांच्या सहयोगाने राबवण्यात येते.
महिला समृध्दी योजना
चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता महिला अथवा ज्या गावात राष्ट्रीयकृत बँका नाही अशा गावावतील महिला लाभार्थींसाठी महिला समृध्दी योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु. १५,०००/- व अनुदान रु. १०,०००/- असे दोन्ही मिळून
'लिडकॉम'ची 'प्रशिक्षण योजना'
लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित चर्मकार समाजाच्या
विकासासाठी विविध योजना राबवते. त्यांची थोडक्यात माहिती या ब्लॉगद्वारे
क्रमाक्रमाने प्रसिद्ध करणार आहे.
या ब्लॉगमध्ये आपण 'लिडकॉम'तर्फे राबवल्या जाणाऱ्या 'प्रशिक्षण योजने'संबंधी माहिती घेवू.
उद्देश :
या ब्लॉगमध्ये आपण 'लिडकॉम'तर्फे राबवल्या जाणाऱ्या 'प्रशिक्षण योजने'संबंधी माहिती घेवू.
प्रशिक्षण योजना
उद्देश :
चर्मकार समाजातील लाभधारकांना व्यवसायासाठी
लागणारे तांत्रिक
चर्मोद्योग आणि चर्मकार समाजाच्या विकासासाठी : 'लिडकॉम'
लिडकॉम
(LIDCOM) म्हणजेच महाराष्ट्र चर्मोद्योग
विकास महामंडळ (Leather
Industries Development Corporation of Maharashtra ).
हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. आता या
महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्यात आले आहे. चर्मकार समाजाच्या विकासासाठी स्थापन
केलेल्या या महामंडळाविषयी थोडक्यात प्रस्तावना :
अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच राज्यात चर्मोद्योगाचा विकास करण्यासाठी शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाची स्थापना ०१ मे १९७४ रोजी झालेली आहे.राज्यात चर्मोद्योग विकासास चालना देणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान
अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच राज्यात चर्मोद्योगाचा विकास करण्यासाठी शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाची स्थापना ०१ मे १९७४ रोजी झालेली आहे.राज्यात चर्मोद्योग विकासास चालना देणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान
मंगळवार, १५ मे, २०१२
लातूर मंडळातर्फे नि:शुल्क वधु-वर नोंदणी
वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने वधु-वर
नोंदणीचे कार्य हाती घेण्यात आले आहे. वधु-वर नाव नोंदणी नि:शुल्क होणार आहे.
यासाठी इच्छुक वधु-वरांनी आपली सर्व माहिती (नाव, पत्ता, फोन नंबर, जन्मतारीख, उंची, लिंग, शिक्षण, नोकरी, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ई.)
आणि पोस्टकार्ड आकाराच्या फोटो सह मंडळाचे विश्वस्त अॅड. श्री. बाळासाहेब कटके आणि
श्री. दिगंबर खरटमोल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. सर्व
विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून
घ्यावा. अधिक माहितीसाठी
मंगळवार, १० एप्रिल, २०१२
लातूर येथील सामुदायिक विवाह सोहळा तहकूब
वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी रविवार, १५ एप्रिल २०१२ रोजी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळा, निवडणूक आणि अन्य काही कारणास्तव तहकूब करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी मंडळांच्या विश्वस्तांना संपर्क करा. त्यांचे संपर्क क्रमांक पुढे दिलेले आहेत.
गुरुवार, २९ मार्च, २०१२
नाशिक येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन
वीरशैव कंकय्या डोहार समाज
मंडळ, नाशिक यांनी रविवार, ०१ एप्रिल २०१२
रोजी 'श्रद्धा' लॉन, गाडगे महाराज पुलाजवळ, गणेशवाडी, पंचवटी, नाशिक येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा
करून घ्यावा असे मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याबद्दल अधिकच्या माहितीबद्दल
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
