बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

वधु-वर मेळावे घेणाऱ्या मंडळांना लिहिलेले एक पत्र

माझे वडील डॉ. श्री. मधुकर मारुती सोनवणे यांनी वधु-वर मेळावे घेणाऱ्या ८-९ मंडळांना ७ मे २०११ रोजी लिहिलेले एक पत्र.


विषय : मंडळाची माहिती इंटरनेटवर टाकणे बाबत.


माननीय महोदय,

गेली अनेक वर्षे आपले मंडळ वधु-वर मेळाव्यांच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम उत्तमरीत्या करीत आहात, हे पाहून आनंद होत आहे. आपल्या या समाजकार्याला माझा थोडाफार हातभार लागावा या हेतूने हा पत्रव्यवहार करत आहे.
मी स्वतः http://www.dhor.in/ हे केवळ ढोर समाजाला वाहिलेले इंटरनेटवरील संकेतस्थळ (वेबसाईट) चालवत आहे. समाज जागृती आणि विकास हाच या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या समाजबांधवांना एकाठिकाणी एकत्र आणण्याचे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून करत आहे. तसेच यापुढे जाऊन समाज बांधवांसाठी ई-मेल आणि sms सेवा, शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, नोकरीतील संधी, विविध शासकीय आणि खाजगी सेवा, सुविधा, योजना, शिष्यवृत्या आदी. अशा विविध गोष्टींचा समावेश संकेतस्थळामध्ये करण्याचा मानस आहे. या सर्व सोयींचा फायदा सर्वांनाच होईल. अशा प्रकारे उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे समाजात जागृती होऊन विकास साधला जाईल. संकेतस्थळांच्या होणाऱ्या विस्ताराबरोबर समाजाच्या घटकांना सामावून घेणेही मला महत्वाचे वाटते. याच कारणास्तव समाजाचे प्रतिबिंब असलेल्या आणि समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध व्यक्ती, संस्था / मंडळे यांची माहिती या संकेतस्थळावर टाकण्याचा विचार आहे. मी आपल्या मंडळाला मंडळाची माहिती इंटरनेटवर टाकण्यासाठी आवाहन करत आहे. याकामी आपल्या मंडळाची माहिती http://www.dhor.in/ या संकेतस्थळावर टाकण्याची सेवा सादर करीत आहे. सदर सेवा सशुल्क राहील. या माहितीमध्ये मंडळांच्या सदस्यांची नावे, पत्ते, फोटो, फोन नंबर याशिवाय मंडळाच्या कार्याचा उल्लेख केला जाईल. मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची / उपक्रमांची माहिती, कार्यक्रमांचे फोटो, विवाहेच्छुक मुलामुलींची यादी ई. संकेतस्थळावर  टाकण्यात येईल. आपण मंडळाची माहिती इंटरनेटवर टाकल्याने आपल्या मंडळाला आणि पर्यायाने समाजाला होणारे फायदे मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो:
१) मंडळाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण होण्यास मदत होईल.
२) मंडळाच्या कार्याची समाजात मोठ्या प्रमाणात आणि दूरवर दाखल घेतली जाईल.
३) विवाहेच्छुक मुलामुलींची यादी इंटरनेटवर टाकल्याने वधु-वर पुस्तिका छापण्याचा खर्च वाचेल.
४) मंडळाकडे नाव नोंदलेल्या विवाहेच्छुक मुलामुलींना (व त्यांच्या पालकांना) एकमेकांची वय, उंची आणि शिक्षण याशिवाय एकमेकांची अपेक्षा, फोटो अशा इतर महत्वाच्या गोष्टींचीही विस्ताराने माहिती घरबसल्या घेता येईल व त्या आधारे योग्य जोडीदार निवडण्यास मदत होऊ शकेल.
५) या सेवेसाठी आकारले जाणारे शुल्क हे या पत्रात नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या विस्तारासाठी पर्यायाने सामाजकार्यासाठीच वापरले जाणार आहे.

वरील सर्व मुद्यांचा विचार करून मंडळाची माहिती इंटरनेटवर टाकण्यासंबंधी आपल्या मंडळाचा निर्णय लेखी कळवावा. यासंदर्भात आपण माझा मुलगा श्री. मोतीसागर मधुकर सोनवणे (मोबाईल नं. 98XXXXXXXX) याच्याशी संपर्क करावा. 

आपला शुभचिंतक,
डॉ. मधुकर मारुती सोनवणे


या पत्रासंदर्भात काही मंडळांच्या अध्यक्षांचे तसेच मंडळातील सभासदांचे फोन येऊन गेले, परंतु अजून कोणतेही अधिकृत / लेखी उत्तर आले नाही. या पत्राच्या अनुषंगाने पुढे लिखाण होईलच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा