श्री. यशवंत व्हटकर हे स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक नामदेव व्हटकर यांचे पुत्र. १९८२ मध्ये ते एम. ए. राज्यशास्त्र झाले. काही काळ ते कोल्हापूरमध्ये राज्यशास्त्राचे अध्यापक होते. १९८३ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी
निवड झाली. त्यांना आजवरच्या
कारकिर्दीत चांगल्या कामगिरीबद्दल १७० प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. आज ते मुंबई क्राइम ब्रँच मध्ये सहायक पोलीस आयुक्त या पदावर काम करत आहेत. त्यांनी पोलीस
अधिकारी पदावर काम करत असताना आलेल्या अनुभवांवर दोन पुस्तके लिहिली आहेत.
१) 'गुन्हेगारांच्या मागावर' - हा कथासंग्रह म्हणजे अनुभवांची रोचक 'स्टेशन डायरी' आहे. हा कथासंग्रह म्हणजे पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असताना बऱ्यावाईट अनुभवांच्या केवळ नोंदी नाहीत तर त्यात मानवी स्वभावाच्या अनेकविध पैलूंचे दर्शन येथे घडते.
२) 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' - हाही कथासंग्रह खडतर अनुभवांची डायरीच आहे. 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलीस खात्यातील बहुसंख्य व्यक्ति, आपल्या मनातील 'खाकी वर्दी'बद्दल असलेल्या गैरसमजांना छेद देतात. या कथनात, खात्याच्या ब्रीदवाक्याला बांधील असणारे अनुभव नितळ पारदर्शीपणे मांडले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा