बुधवार, २१ डिसेंबर, २०११

वार्षिक स्नेहसंमेलन आणि वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे रविवार, २२ जानेवारी २०१२ रोजी वाशी (नवी मुंबई) येथे आयोजन

वीरशैव कक्कय्या समाज मंडळ, नवी मुंबई यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन आणि वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार, २२ जानेवारी २०१२ रोजी नवी मुंबई हायस्कूल सभागृह, सेक्टर १, वाशी (नवी मुंबई) येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. विवाहेच्छुक मुला-मुलींची नोंदणी नि:शुल्क आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. या कार्यक्रमातच गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. गंगाधर शिंदे ९८२०९६६१६६, कार्याध्यक्ष श्री. पुंडलिक खरटमोल ९८६७६९३५२३, सचिव श्री. माणिक दरवेश ९८२०१८१०२१, खजिनदार श्री. नागेंद्र गायकवाड ९९६९१३०८०९ यांच्याशी संपर्क साधावा.
या संस्थेच्या इतर विश्वास्थानांही संपर्क करू शकता. त्यांचे फोन नंबर www.dhor.in संकेतस्थळाच्या Committees विभागात दिले आहेत.

तसेच वीरशैव कक्कय्या बारामती मंडळाचा वधूवर मेळावा रविवार, २५ डिसेंबर २०११ रोजी बारामती, जिल्हा - पुणे येथे होणार आहे. याची अधिक माहिती लवकरच या ब्लॉगवर पोस्ट करण्यात येईल.

1 टिप्पणी: