मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - ३ : श्री. गणपतराव देवजी तपासे

श्री. गणपतराव देवजी तपासे यांचा जन्म १५ जुलै १९०९ रोजी झाला. ते मुळचे सातारा (महाराष्ट्र) येथले. त्यांचे शालेय शिक्षण अमेरिकन मिशनरी स्कूल येथे झाले. नंतरचे शिक्षण पुण्याच्या फर्गुसन कॉलेज आणि लॉ कॉलेज येथे झाले. त्यांनी तेथे कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. ते १९३८ साली सातारा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांच्या राजकीय करियरला सुरुवात झाली. त्याच वर्षी ते सातारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. त्यांनी १९४० मध्ये सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात भाग घेतला तसेच १९४२ साली झालेल्या 'चाले जाव'च्या आंदोलनात त्यांना १५ महिन्यांची कैदही झाली.

१९४६ आणि १९५२ साली ते मुंबई विधानसभेवर (सध्याची महाराष्ट्र राज्य विधानसभा) निवडून आले आणि मंत्री झाले. त्यांनी समाज कल्याणाचे अनेक निर्णय घेतले. पुढे ३ एप्रिल १९६२ रोजी ते राज्यसभा सदस्य झाले. काही काळ ते रेल्वे सेवा आयोग, मुंबईचे चेअरमन सुद्धा होते.

२ ऑक्टोबर १९७७ रोजी त्यांची उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. पुढे २८ फेब्रुवारी १९८० ते १४ जून १९८४ या कालावधीमध्ये ते हरियाना राज्याचे राज्यपाल होते.  श्री. गणपतराव देवजी तपासे यांचे आत्मचरित्र "Mudhouse to Rajbhavan : Autobiography of a Governor" (1983) आहे. त्यांचे ०३ ऑक्टोबर १९९१ रोजी निधन झाले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा