मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, १५ एप्रिल २०१२ रोजी, दुपारी १२:३० वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि ४ फोटो प्रत्येकी वधु आणि वरासाठी नोंदणीसाठी येताना सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी मंडळांच्या 

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात 'संत कक्कय्या'

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने 'मराठी विश्वकोश' इंटरनेटवर टाकणे सुरु केले आहे. आतापर्यंत ३ खंड प्रकाशित झाले आहेत. पुढील खंडही लवकरच इंटरनेटवर प्रकाशित होणार आहेत. इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात खंड ३ - सूची ४ मध्ये 'संत कक्कय्या'चा 'कक्कय्य' या नोंदशीर्षकाखाली (विषय - धर्म) नोंद करण्यात आली आहे. त्यातील मजकूर समाज बांधवांसाठी जशाच्या तसा खाली देत आहे. 

कक्कय्य : (सु. १२ वे शतक). कर्नाटकात होऊन गेलेला एक वीरशैव संत. तो जातीने ढोर असून मूळचा माळव्याचा (मध्य प्रदेश) रहिवासी होता. बसवेश्वरांच्या वीरशैव पंथाची कीर्ती ऐकून तो बसवकल्याण येथे गेला व

शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १४ - डॉ. ज्योती व्हटकर

डॉ. ज्योती जयवंत व्हटकर या स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक कै. नामदेव व्हटकर यांच्या नात व लेखक श्री. जयवंत नामदेव व्हटकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी 'मराठा आणि पेशवे कालखंडातील कर्तबगार स्त्रिया' या नावाचे पुस्तक लिहिले असून ते दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. डॉ. ज्योती, 

कक्कय्या समाज परिचय १३ - श्री. ना. म. शिंदे

श्री. ना. म. शिंदे हे लेखक व कवी आहेत. त्यांचे साहित्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले आहे. ते सहायक आयुक्त (भारतीय राजस्व सेवा) होते. 'जातीला जात वैरी' ( पॉप्युलर प्रकाशन, १९९०) या त्यांच्या पुस्तकास राज्य पुरस्कार मिळाला आहे. यांचा काव्य संग्रहही प्रसिद्ध आहे तसेच ते नियमित राजप्रिया अक्षरपान’ हा दिवाळी अंकही प्रसिद्ध करतात. 'उभारणी' हे कक्कय्या समाजाची माहिती देणारे

कक्कय्या समाज परिचय १२ - प्रा. श्री. भगवान इंगळे

प्रा. भगवान इंगळे हे कक्कय्या समाजातील लेखक आहेत. त्यांनी 'ढोर' 'भिडू' अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. ही दोन्ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलीली आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशा ह्याही प्राध्यापक आहेत व कन्या नीलम ह्या कॅप्टन आहेत. त्यांच्या पुस्तकांचा परिचय खाली करून दिला आहे.

१) 'ढोर' - आधुनिक सुखसोयींमुळे ढोर समाजाचा धंदा पूर्ण बसला व ढोर समाज उद्ध्वस्त झाला. याच ढोर समाजातील एक गट शिकला आणि स्थिर झाला. अशाच एका तरुणाची ही प्रातिनिधिक कहाणी.

२) 'भिडू' - आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय ११ - श्री. तायप्पा हरी सोनवणे

कै. ताय्यप्पा हरी सोनवणे हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे खासदार होत. त्यांचा जीवन परिचय खालील प्रमाणे आहे.
१) कक्कया समाजाचे पहिले वकील व खासदार. 
२) जन्म १० सप्टेंबर १९१० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे या गावी अत्यंत गरीब परिस्थितीत झाला. 
३) लहानपणीच इंग्रजी, फ्रेंच शिकून व रात्रशाळेत शिकून मॅट्रिक झाले. 
४) अर्थशास्त्र व राज्यशास्त्र घेऊन बी. ए. व नंतर नोकरी करत असताना वकील झाले. 
५) मुंबईत वकिली शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून कायद्याच्या अभ्यासाचे मार्गदर्शन.

बुधवार, १८ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १० - कु. सोनल सोनकवडे (आयपीएस)

कु. सोनल सोनकवडे या महापारेषणचे मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांची कन्या. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २००६ साली अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांकाने पास होऊन ठाणे येथे उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. त्यांचे २००९ च्या युपीएससी परीक्षेत पास होऊन आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये निवड झाली. पुन्हा २०१० च्या युपीएससी च्या परीक्षेत तसेच मुलाखतीमध्ये निवड होऊन आय पी एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) पदासाठी निवड झाली. तिची आय पी एस साठी निवड होण्याअगोदर 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ती नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

युपीएससी डेडिकेशनची परीक्षा (शब्दांकन: वसुंधरा काशीकर-भागवत)

तुम्ही किती पुस्तकं वाचता यापेक्षा कसं वाचता हे महत्वाचं आहे. युपीएससीमध्ये नेहमीच विश्‍लेषणात्मक (ऍनॅलिटिकल) प्रश्‍न विचारण्यावर भर दिला जातो. त्यामुळे युपीएससी ही आकलनाची परीक्षा आहे. २००९ च्या युपीएससी परीक्षेत चौथ्या प्रयत्नात आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये सिलेक्‍शन झालेली आणि नागपूरमध्ये ट्रेनिंग घेत असलेली सोनल सोनकवडे. बघुयात तिचे अनुभव काय आहेत ते...

कक्कय्या समाज परिचय ९ - ढोर समाजातील आडनावे

ढोर समाजात असलेल्या आडनावांची यादी खाली देत आहे. त्यामध्ये काही बदल असल्यास किंवा आणखी आडनावे असल्यास टिप्पणी मध्ये टाकावीत.

अष्टेकर (Ashtekar), बागलकोटकर (Bagalkotkar), बागले / बगळे (Bagle / Bagale), भालशंकर (Bhalshankar), भोसले (Bhosale), बिदरकर (Bidarkar), बोराडे (Borade), बोरुडे (Borude), बोधने (Bodhane), चांदेकर (Chandekar), चांदोडे (Chandode), चौधरी (Chaudhari), चौगुले (Chaugule), डहाके (Dahake), दरवेश (Darvesh), ढाके (Dhake), दरवेशी (Darveshi), दरवेशकर (Darveshkar), धडके (Dhadke), धनशेट्टी (Dhanshetti), गायधनकर (Gaidhankar / Gaydhankar), गायकवाड (Gaikwad), गजाकस (Gajakas), गजाकोश (Gajakosh), गजाकुंस (Gajakuns), गजरे (Gajre), गणेशकर (Ganeshkar), गरग (Garag), घोडके (Ghodake), हसनाळे / हासनाळे (Hasnale), हौसारे (Hausare), हवाले (Havale / Hawale), होळकर (Holkar), होटकर (Hotkar), हुटगीकर (Hutgikar), इंगळे (Ingle / Ingale), इंगोले (Ingole), जोग (Jog), जोगदंड (Jogdand), जोगदंडे (Jogdande), कदम (Kadam), कडू (Kadu), कळंबे (Kalambe), कल्याणकर (Kalyankar), कटकदौंड / कटकदोंड (Katakdaund / Katakdond), कटकधोंड (Katakdhond),

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय ८ - पहिले व्यक्ती

कक्कय्या समाज्यातील विविध क्षेत्रातील पहिले कोण?

पहिले मॅट्रिक - कै. गंगाधर यशवंत पोळ, कोल्हापूर
पहिले पदवीधर - कै. तुळजाराम अण्णाजी सोनवणे
पहिले न्यायाधीश - कै. तुळजाराम अण्णाजी सोनवणे
पहिले वकील - कै. ताय्यप्पा हरी सोनवणे, सोलापूर
पहिले खासदार - कै. ताय्यप्पा हरी सोनवणे, सोलापूर
पहिले युनोत भाषण - कै. ताय्यप्पा हरी सोनवणे, सोलापूर
पहिले आमदार - कै. गणपतराव देवजी तपासे, सातारा
पहिले मंत्री - कै. गणपतराव देवजी तपासे, सातारा
पहिले राज्यपाल - कै. गणपतराव देवजी तपासे, सातारा
पहिले मुख्यमंत्री - मा. सुशीलकुमार शिंदे, सोलापूर
पहिल्या महिला आमदार - सौ. राधाबाई श्रेयकर, बेळगाव
पहिल्या महिला खासदार - सौ. रत्नमाला सावनूर, बेळगाव
पहिल्या महिला केंद्रीय मंत्री - सौ. रत्नमाला सावनूर, बेळगाव
पहिल्या महापौर - सौ. निर्मला बाबुराव सावळे (मीरा भाईंदर महानगर पालिका)
पहिले नगराध्यक्ष - श्री. अशोक तपासे (सातारा नगरपरिषद)
पहिले चित्रपट निर्माते - कै. नामदेवराव व्हटकर, कोल्हापूर
पहिले चित्रपट दिग्दर्शक - कै. नामदेवराव व्हटकर, कोल्हापूर
पहिले मुख्य अभियंता - श्री. आनंदराव गंगाधर पोळ, कोल्हापूर
पहिले सिव्हील सर्जन - डॉ. सीताराम चौगुले
पहिल्या महिला डॉक्टर - डॉ. विमल कदम, बेळगाव
पहिले वैमानिक - श्री. दीपक गजरे
पहिली महिला वैमानिक - कॅप्टन नीलम भगवान इंगळे

वरील यादी पहिले इंजिनिअर, पहिले डॉक्टर, पहिले IAS, पहिले IPS, पहिले नगरसेवक, पहिले सरपंच, पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी, पहिले कॅलेक्टर, पहिले Phd, पहिले सचिव अश्या प्रकारे वाढवता येईल. आपणास अधिक माहिती असल्यास तपशिलासह कळवा. ती समाजाला अतिशय प्रेरणा देणारी आहे. वरील महितीत काही बदल असल्यास मला टिप्पणीद्वारे जरूर कळवावे.

कक्कय्या समाज परिचय ७ - श्री. राजकुमार व्हटकर (आयपीएस)

श्री. राजकुमार व्हटकर (आय पी एस) हे सध्या औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत. त्यांची 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. तुम्हाला ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

परिश्रमाने गाठले यूपीएससीचे शिखर (शब्दांकन: श्री. मनोहर भोळे)
 
दहावीत केवळ ५३ टक्के, बारवीत ७० टक्के, बी. कॉम. मध्ये ६६ टक्के, तर एमबीएमध्ये ६६ टक्के गुण. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील ही सर्वसाधारण प्रगती. बारावीपर्यंतचे शिक्षणही ग्रामीण भागात झाले. पहिली ते चौथी फलटणच्या नगरपरिषद शाळा क्रमांक दोनमध्ये. पाचवी ते दहावी येथील मुधोजी हायस्कूलमध्ये. या व्यक्तिमत्त्वाचा राजकुमार व्हटकर हा एक सामान्य विद्यार्थी ते भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी हा प्रवास तसा रोमांचक आहे. 
 
बी. कॉम. होईपर्यंत पुढे काय करायचे, हे माहीत नव्हते. ठरले नव्हते. बी.कॉम. संपत आले, मग मुले करतात म्हणून आपणही एमबीए करू म्हणत बी. कॉम.च्या शेवटच्या वर्षाला असताना एमबीएची प्रवेश परीक्षा दिली. यथावकाश भारती विद्यापीठात प्रवेशही मिळाला. पुण्यातील भारती विद्यापीठातून एमबीए पूर्ण झालेसुद्धा. आता या वेळेपर्यंत यूपीएससी म्हणजे काय असते, याची अजिबात कल्पना नव्हती. वडिलांचा घरी चामड्याचा व्यवसाय. आपल्या एमबीए ज्ञानाचा उपयोग करून आपण आधुनिक पद्धतीने या व्यवसायाचा विस्तार करू, यातच स्वतःचे करिअर करू, अशी या वेळेपर्यंतची मनाची तयारी होती; पण...
 
"तू यूपीएससी पास होऊन स्वतःची लायकी व कर्तृत्व सिद्ध कर. तुला सरकारी नोकरी करायची नसेल तर नको करू, पण तू पोस्ट मिळवू शकतोस ही बाब सिद्ध करून तर दाखव !'' या वाक्‍याने एक वादळ उठले, जे थेट आयपीएस झाल्यावरच शमले. नातलग डॉ. विजयालक्ष्मी सोनवणे यांची ही आव्हानात्मक भाषा होती. ही गोष्ट आहे १९९५ या वर्षाची.
 
एमपीएससी व यूपीएससीचा एकत्रित प्रयोग खूप कमी जण करतात. दोन्ही दगडीवर हात नको, सटकलो तर खोल दरीत कोसळू, अशी भीती मनात असते. व्हटकर यांनी मात्र हा प्रयोग यशस्वीपणे सिद्ध केला. अगदी वेगवेगळे ऑप्शनल विषय ठेवून. एमपीएससीसाठी बॅंकिंग आणि अकाऊंट्‌स तर यूपीएससीसाठी पूर्वपरीक्षेला कॉमर्स, मुख्य परीक्षेला इतिहास व मराठी वाङ्‌मय. एकूण पाच विषय ही स्वारी एकसाथ हाताळत होती.
 
डोक्‍यात या विषयाचे फ्यूजन कसे काय नाही झाले, ते यांनाच माहीत. १९९५ ला एमपीएससीतून कक्ष अधिकारी, तर १९९६ या वर्षी लेखा अधिकारी वर्ग-१ म्हणून निवडही झाली. शिवाय या दोन्ही वर्षी यूपीएससीची पूर्वपरीक्षाही पास होण्याची किमया घडली. स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचे. ठरले ते ठरले. आता मागे नाही हटायचे. "लायकी सिद्ध करण्यास...' हे वाक्‍य सतत डोक्‍यात घुमायचे. पद मिळाले पाहिजे बस्स ! शेवटी इप्सित साध्य झाले. एमपीएससीतून का होईना, दोन पदे मिळाली. तसे पाहता हे आव्हान कधीच पार करून झाले होते.
 
स्वतःचे दोष हेरून त्यावर स्वतः उपाययोजना करण्याची पद्धत प्रचंड यश देऊन गेली. माणूस स्वतःच स्वतःचा उत्तम परीक्षक असतो, हा अलिखित नियमच सिद्ध झाला. या सगळ्या कष्टाची परिणती यूपीएससीची मुख्य परीक्षा पास होण्यात झाली. आत्मविश्‍वासाच्या कक्षा रुंदावल्याने क्षितिजापलीकडील यशाची चाहूल लागली. संधी हातची गेली नाही पाहिजे. पाहिजे तेवढे कष्ट करू पण सिलेक्‍शन झाले पाहिजे, या निर्धारातून दिल्लीवर आक्रमणाची मोहीम आखली गेली. ती यशस्वी झाली.