बुधवार, १४ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - ४ : श्री. गंगाधर यशवंत पोळ

श्री. गंगाधर यशवंत पोळ यांचा जन्म २८-०४-१९०० रोजी मौजे शिरगाव, तालुका चिकोडी, जिल्हा बेळ्गाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात होऊन जिल्ह्यातून हरीजनातून पहिला विद्यार्थी व कक्कय्या समाजातील पहिला मॅट्रिक होण्याचा मान त्यांनी १९२३ साली पटकावला व Deputy Education Inspector या पदावर महाराष्ट्र राज्याची नोकरी १९५५ पर्यंत केली.

श्री. गंगाधर यशवंत पोळ यांची समाजसेवा :
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर घनिष्ट स्नेह व समाज कार्य.
२) सातारा येथे समाजातील मुले जमवून शिक्षण देण्याचे कार्य.
३) कोल्हापुरात श्री देवी इंदुमती वसतिगृह उभारण्यात मोलाचे कार्य.
४) लोकोन्नती समाज मंडळ या संस्थेची राधानगरी तालुक्यात स्थापना.
५) आत्मोद्धार साप्ताहिक सुरु करण्यात मोलाचे कार्य.
६) निपाणीत कक्कय्या बोर्डिंगची स्थापना करण्यात मोलाचे कार्य.
७) कोल्हापूर कक्कय्या समाज सहकारी क्रेडीट सोसायटी स्थापना करण्यात मोलाचे कार्य. ही कक्कया समाजाची भारतातील पहिली सहकारी संस्था.
८) "विद्यार्थ्यांचा शालापाठ" व "प्राथमिक विद्यार्थ्यांची परीक्षा" ही पुस्तके लिहिली. 
९) सन १९३६ साली कक्कय्या समाजाच्या यामनूर हुबळी धारवाड येथे झालेल्या ज्ञानप्रकाश सभेचे अध्यक्षपद. तसेच समाजाच्या अनेक सभांमध्ये सक्रीय सहभाग.
१०) सोलापूर येथे १९३६ साली झालेल्या कक्कय्या समाजाच्या पहिल्या परिषदेत सक्रीय सहभाग.

मुलगा श्री. आनंदराव गंगाधर पोळ हे महाराष्ट्र शासनात सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य अभियंता पदापर्यंत गेलेले पहिले अभियंता होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा