शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

"ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण

जालन्याच्या श्रीमती भारती शिवलिंगराव खरटमल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सर्व समाजबांधवांना उपरोक्त विषयासंबंधी केलेले आवहन.

सर्व समाजबांधवांना नमस्कार,
मी भारती शिवलिंगराव खरटमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी राहणार मुळ जालना. आमच्या संस्थेमार्फत "ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण पुर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी विविध ठिकाणांहून माहिती मी संकलित करत आहे.
        आपल्या सर्व समाजबांधवांसाठी मला असे सांगावेसे वाटते की, "ढोर / कक्कय्या / कंक्कय्या," या आपल्या जातीच्या समाजातील तळागळातील लोकांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रश्न आपण विविध ठिकाणांहून येऊन एक निवेदन देऊन आमच्या कार्यालयाकडे मांडावेत व शासनाकडे काही योजना असतील तर त्याचा फायदा आपल्या लोकांनी करुन घ्यावा ही अपेक्षा आहे.
तसेच जिल्हानिहाय आपल्या जातीच्या लोकांच्या संघटना स्थापित करुन त्यांना बळकटीकरण करणे महत्वाचे आहे, बेरोजगार युवकांसाठी काही प्रशिक्षणे आपण आयोजित करुन घेऊ शकतो, महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी महिलांसाठी काही कार्यक्रम जसे बचतगट स्थापन करणे त्यांना प्रशिक्षित करणे, अशा या विविध कार्यक्रमांचा फायदा आपल्या समाजातील लोकांनी जास्तीत जास्त करुन घ्यावा ही कळकळीची सर्वांना विनंती आहे. तसेच आपल्या लोकांचा सहभाग व्यसाय, नौकरी यात कसा वाढवता येईल याचा सर्वमताने विचार करावा.

बार्टी मार्फत खालील कार्यक्रम घेतले जातात.
१) विविध जातींवर संशोधन केले जाते.
२) विविध विषयांवर प्रशिक्षणे आयोजित केली जातात.
३) माहितीच्या अधिकाराचे प्रशिक्षण दिले जाते.
४) कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
५) शासनाच्या विविध योजनांचे मूल्यमापन केले जाते.
अशाप्रकारे विविध विषयांवर कार्यक्रम पुर्ण महाराष्ट्रभर राबवले जातात.

तसेच "ढोर" जातीच्या बद्द्ल आपल्याकडे काही साहित्यसंशोधन अहवाल, पुस्तके, वगैरे माहिती उपलब्ध असल्यास कृपया आपण मला संशोधनासाठी उपलब्ध करुन द्यावी. कारण "ढोर" जातीच्या बद्द्ल महाराष्ट्रातील हा पहिला सर्व्हे खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे, ज्यावरुन शासनाला नविन धोरण बविण्यासाठी उपयोग होईल.
सर्व समाज बांधवांकडून मदतीची अपेक्षा आहे. कृपया मला खालील ई-मेल व फोन वर संपर्क साधून सहकार्य करावे. तसेच आपल्या लोकांनी लवकरात लवकर आमच्या कार्यालयात येऊन एक निवेदन आमच्या मा. महासंचालकांना द्यावे ही नम्र विनंती.
 

आपली विश्वासू
भारती शिवलिंगराव खरटमल
संशोधन अधिकारी, संशोधन कक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,
२८, क्विन्स गार्डन, सर्किट हाऊस जवळ,
पुणे- ४११०११
फ़ॅक्स नं. ०२०-२६३३३५९६
मो. ९४०४९९९४५०
ई-मेल:- bharati.care83@gmail.com
Website: www.barti.maharashtra.gov.in

1 टिप्पणी:

  1. भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीची झापडं आपल्या डोळ्यांवर इतकी आहेत की समोर असूनही, विविध अनुभव येऊनही आपण आपल्या कायद्यांत बदल करायला तयार नसतो. त्याचाच एक नमूना म्हणजे अलीकडेच मुलाच्या नावात आई आणि वडील दोघांच्याही नावाचा समावेश व्हायला हवा, असं आपण मान्य केलं. त्यानंतर आईचं नाव लावता येतं, मग तिची जात लावण्याचाही मुलांना हक्क मिळायला हवा, अशी एक मागणी पुढे आली. यासंदर्भातच सर्वोच्च न्यायालयानं एक पाऊल पुढे टाकलंय.


    .


    एखाद्या दांपत्यानं आंतरजातीय विवाह केला असेल तर आपल्याकडे सरसकट त्यांच्या मुलांना त्यांच्या पित्याचीच जात लावली जाते. पण या पारंपरिक विचाराच्या पलीकडे जाणारा एक निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. अर्थात हा निर्णय एका मागासवर्गीय समाजातील आई आणि अमागासवर्गीय समाजातील वडील यांच्यासंदर्भात बोलताना सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या मुलांना योग्य पुरावे सादर करून आईची ‘जात’ लावण्याची परवानगी दिली. अर्थात, लग्नाच्या वेळी आईनं आपली जात बदलली नसेल तर...


    .


    सर्वोच्च् न्यायालयाच्या या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेऊन राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं १८ जानेवारी २०१२ रोजी एक प्रस्तावही तयार केला आहे. विधी व न्याय विभागानंही या प्रस्तावाला हरकत घेतली नाही. सामाजिक न्याय विभागाकडे परवानगीसाठी हा प्रस्ताव पाठवला गेलाय. त्यामुळे आता आंतरजातीय दांम्पत्याच्या मुला-मुलींना त्यांच्या इच्छेनुसार आईची जात लावण्याचा अधिकार मिळू शकेल अशी आशा दुणावलीय. असं जर झालं तर हा सामाजिकदृष्ट्या एक महत्त्वाचं पाऊल ठरेल, यात शंका नाही.
    what about this?

    उत्तर द्याहटवा