शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

दिनोदिन बढता जाये कारोबार

समाजाचे इंटरनेटवरील अस्तित्व, समाजाप्रती भावना व्यक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवीन काहीतरी शिकण्याची ओढ या मिश्रणातून या ब्लॉगची निर्मिती झाली. हा ब्लॉग सुरु होयीपर्यंत गुगलच्या मराठी शोध यंत्रावर (search engine) वर ढोर आणि ढोर समाज (मराठीत) टाईप होत नव्हते. या ब्लॉगच्या वाढणाऱ्या लोकप्रियतेबरोबर ते शब्द गुगलवर येऊ लागले. (गुगलच्या मराठी शोध यंत्रावर जाऊन संगणकाच्या कळयंत्रावर dhor किंवा dhor samaj असे इंग्रजीत टाकल्यास त्याचे मराठीत आपोआप रुपांतर होते). तरीही अजून 'कक्कय्या' हा शब्द अजूनही गुगल शोध यंत्रावर येत नाही. कारण त्याचा आंतर्जालातील संदर्भ आणि या शब्दाचा शोध घेणारे वाचक नाहीच्या बरोबर आहेत. येणाऱ्या काळात तीही कमी भासणार नाही याची खात्री वाटते. कारण हा
ब्लॉग सुरु करून साधारण ३ महिने झाले तोच ९२५ याला वाचक मिळाले. म्हणजे रोज सरासरी १० लोक हा ब्लॉग वाचतात. केवळ भारतातूनच नाही तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी याशिवाय इतर देशातही आपले वाचक आहेत. या ब्लॉगची सेवा पुरवणाऱ्या ब्लॉगर डॉट कॉम ने या ब्लॉगची प्रेक्षक सांखिकी तयार केली आहे, ती खाली जोडली आहे. त्यावर क्लिक करून मोठ्या आकारात पाहता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा