गुरुवार, २६ जुलै, २०१२

असे मिळते जात प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अनेकदा महत्त्वाच्या वेळेला या प्रमाणपत्राची मागणी होते आणि नेमके हे प्रमाणपत्र आपल्याकडे उपलब्ध नसते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रमाणपत्राची आणि विशेषत: निवडणुकीच्या काळातही या प्रमाणपत्राची विशेष आवश्यकता भासते.

हे प्रमाणपत्र कसे मिळविले जाते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कोठे करायचा, प्रमाणपत्राची पडताळणी म्हणजे काय याविषयीची माहिती खास वाचकांसाठी...

मंगळवार, २४ जुलै, २०१२

योजना आपल्या दारी

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. 

गरीब विद्यर्थ्यांसाठी पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती. 

गरीब मुलींसाठी 3 महिन्यांचा मोफत 'डिप्लोमा ट्रॅव्हल व टुरिझम' अभ्यासक्रम. 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आणि स्त्रियांसाठी IDEMI तर्फे होणारा अभ्यासक्रम सवलतीमध्ये.

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती.

मंगळवार, १० जुलै, २०१२

गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची

श्री. सुखदेव नारायणकर, सांगली यांचा 'गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची' हा लेख 'संत कक्कय्या पत्रिके'च्या 2011 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. दिवाळी अंकाच्या रूपाने काही लोकांच्या वाचण्यात आलेला हा लेख श्री. विलास व्हटकर यांनी ई-मेलच्या माध्यमातून सार्वत्रिक केला. हा लेख समाजाच्या संघटनात्मक बांधणीचा मसुदा आपल्यापुढे सादर करतो. समाजातील सर्वांनी वाचवा असाच हा लेख आहे. त्यामुळे तो ब्लॉगवर टाकण्याची परवानगी श्री. सुखदेव नारायणकर यांना मागितली आणि त्यांनी ती लगेच दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आता हा लेख कायमस्वरूपी राहील आणि सर्वांना वाचता येईल. लेखावर (टिप्पणी मध्ये) प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. तसेच समाजबांधवांकडून समाजासाठी उपयुक्त लेख आल्यास त्यांचाही लेख त्यांच्या नावासकट या ब्लॉगवर टाकण्यात येईल.