मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, १५ एप्रिल २०१२ रोजी, दुपारी १२:३० वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि ४ फोटो प्रत्येकी वधु आणि वरासाठी नोंदणीसाठी येताना सोबत आणावीत. अधिक माहितीसाठी मंडळांच्या 

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात 'संत कक्कय्या'

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने 'मराठी विश्वकोश' इंटरनेटवर टाकणे सुरु केले आहे. आतापर्यंत ३ खंड प्रकाशित झाले आहेत. पुढील खंडही लवकरच इंटरनेटवर प्रकाशित होणार आहेत. इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात खंड ३ - सूची ४ मध्ये 'संत कक्कय्या'चा 'कक्कय्य' या नोंदशीर्षकाखाली (विषय - धर्म) नोंद करण्यात आली आहे. त्यातील मजकूर समाज बांधवांसाठी जशाच्या तसा खाली देत आहे. 

कक्कय्य : (सु. १२ वे शतक). कर्नाटकात होऊन गेलेला एक वीरशैव संत. तो जातीने ढोर असून मूळचा माळव्याचा (मध्य प्रदेश) रहिवासी होता. ⇨ बसवेश्वरांच्या वीरशैव पंथाची कीर्ती ऐकून तो बसवकल्याण येथे गेला व

शुक्रवार, २० जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १४ - डॉ. ज्योती व्हटकर

डॉ. ज्योती जयवंत व्हटकर या स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक कै. नामदेव व्हटकर यांच्या नात व लेखक श्री. जयवंत नामदेव व्हटकर यांच्या कन्या आहेत. त्यांनी 'मराठा आणि पेशवे कालखंडातील कर्तबगार स्त्रिया' या नावाचे पुस्तक लिहिले असून ते दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रसिद्ध केले आहे. डॉ. ज्योती, 

कक्कय्या समाज परिचय १३ - श्री. ना. म. शिंदे

श्री. ना. म. शिंदे हे लेखक व कवी आहेत. त्यांचे साहित्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले आहे. ते सहायक आयुक्त (भारतीय राजस्व सेवा) होते. 'जातीला जात वैरी' ( पॉप्युलर प्रकाशन, १९९०) या त्यांच्या पुस्तकास राज्य पुरस्कार मिळाला आहे. यांचा काव्य संग्रहही प्रसिद्ध आहे तसेच ते नियमित ‘राजप्रिया अक्षरपान’ हा दिवाळी अंकही प्रसिद्ध करतात. 'उभारणी' हे कक्कय्या समाजाची माहिती देणारे

कक्कय्या समाज परिचय १२ - प्रा. श्री. भगवान इंगळे

प्रा. भगवान इंगळे हे कक्कय्या समाजातील लेखक आहेत. त्यांनी 'ढोर' व 'भिडू' अशी दोन पुस्तके लिहिली आहेत. ही दोन्ही पुस्तके ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केलीली आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशा ह्याही प्राध्यापक आहेत व कन्या नीलम ह्या कॅप्टन आहेत. त्यांच्या पुस्तकांचा परिचय खाली करून दिला आहे.

१) 'ढोर' - आधुनिक सुखसोयींमुळे ढोर समाजाचा धंदा पूर्ण बसला व ढोर समाज उद्ध्वस्त झाला. याच ढोर समाजातील एक गट शिकला आणि स्थिर झाला. अशाच एका तरुणाची ही प्रातिनिधिक कहाणी.

२) 'भिडू' - आयुष्याच्या विविध टप्यांवर मला जे मित्र भेटले, त्यांच्या जीवनातील