जालन्याच्या
श्रीमती भारती
शिवलिंगराव खरटमल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत
आहेत. त्यांनी सर्व समाजबांधवांना उपरोक्त विषयासंबंधी केलेले आवहन.
सर्व
समाजबांधवांना नमस्कार,
मी भारती शिवलिंगराव खरटमल, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे येथे संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मी राहणार मुळ जालना. आमच्या
संस्थेमार्फत "ढोर" जातीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्वेक्षण पुर्ण महाराष्ट्रात केले
जाणार आहे. सदर सर्वेक्षणासाठी विविध ठिकाणांहून माहिती मी संकलित करत आहे.