बुधवार, १६ मे, २०१२

चर्मोद्योग आणि चर्मकार समाजाच्या विकासासाठी : 'लिडकॉम'

लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच महाराष्‍ट्र चर्मोद्योग विकास महामंडळ (Leather Industries Development Corporation of Maharashtra). हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. आता या महामंडळाचे नाव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्‍यात आले आहे. चर्मकार समाजाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या या महामंडळाविषयी थोडक्यात प्रस्तावना :

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्‍या सामाजिक व आर्थिक विकासासाठी तसेच राज्‍यात चर्मोद्योगाचा विकास करण्‍यासाठी शासनाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित या महामंडळाची स्‍थापना ०१ मे १९७४ रोजी झालेली आहे.राज्‍यात चर्मोद्योग विकासास चालना देणे, चर्मोद्योगातील तंत्रज्ञान
विकसीत करणे, चर्मवस्‍तूंची बाजारपेठ उपलब्‍ध करुन देणे तसेच चर्मोद्योगास प्रोत्‍साहन देण्‍यासाठी शासनाने विविध योजनांची अमंलबजावणी या संस्‍थेमार्फत करण्‍यात येते.शासनाने महामंडळाची सुरुवात पाच कोटींच्‍या भागभांडवलाने केली होती आणि सन २००८-०९ अखेर ७३.२१ कोटी इतके भागभांडवल या महामंडळाकडे प्राप्‍त झाले आहे. भागभांडवलाच्‍या एकुण सर्व रक्‍कमेत महाराष्‍ट्र शासनाचा सहभाग आहे.

स्थापना:
महाराष्‍ट्र चर्मोद्योग विकास महामंडळाची स्‍थापना ०१ मे १९७४ रोजी कंपनी कायदा, १९५२ अंतर्गत करण्‍यात आलेली असून, शासनाच्‍या दि. ०२.०१.२००३ च्‍या निर्णयानुसार आता महामंडळाचे नांव संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित असे करण्‍यात आले आहे.शासन निर्णय क्र. चविम १०९५ / (६४६१) / उद्योग-५ दि. २४.०६.१९९६ अन्‍वये महामंडळाचे संपुर्ण प्रशासकीय नियंत्रण समाजिक न्‍याय विभागाकडे वर्ग करण्‍यात आले आहे.

क्षमता:
महामंडळाचे राज्‍यात दर्यापूर जि.अमरावती, हिंगोली, कोल्‍हापूर व सातारा येथे उत्‍पादन केंद्रे आहेत. या उत्‍पादन केंद्रांतर्गत दोन लाख जोडी (Pairs) इतके उत्‍पादन करण्‍याची क्षमता आहे. या केंद्रांवर सेफ्टी शूज, सॅन्‍डल, चप्‍पल, कोल्‍हापूरी चप्‍पल, फॅन्‍सी शूज, जंगल बुट, डी.एम्.एस्. शूज, कंडक्‍टर कॅश बॅग, ऑफीस बग्‍ज, ऑक्‍सफर्ड शूज, इत्‍यादी प्रकारांचे उत्‍पादन करण्‍यात येते. सदर उत्‍पादने राज्‍यातील बांद्रा पुर्व (मुंबई), वाशी(नवी मुंबई), धुळे, जळगांव, सोलापूर व नांदेड येथील महामंडळाच्‍या विक्री केंद्रांवर विक्रीसाठी ठेवण्‍यात येतात.

लिडकॉम (LIDCOM) चे संकेतस्थळ : http://www.charmodyog.in आहे. संकेतस्थळावर महामंडळाविषयी माहिती, उत्पादने, योजना, ऑनलाईन सेवा, माहिती पुस्तिका, अर्जांचे नमुने, महामंडळाच्या विविध कार्यालयांचे, उत्पादन आणि विक्री केंद्रांचे पत्ते, दूरध्वनी क्र., ई. उपलब्ध आहेत. या संकेतस्थळातील माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा