बुधवार, १६ मे, २०१२

'लिडकॉम'ची 'प्रशिक्षण योजना'

लिडकॉम (LIDCOM) म्हणजेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित चर्मकार समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबवते. त्यांची थोडक्यात माहिती या ब्लॉगद्वारे क्रमाक्रमाने प्रसिद्ध करणार आहे.

या ब्लॉगमध्ये आपण 'लिडकॉम'तर्फे राबवल्या जाणाऱ्या 'प्रशिक्षण योजने'संबंधी माहिती घेवू.

प्रशिक्षण योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील लाभधारकांना व्‍यवसायासाठी लागणारे तांत्रिक
कौशल्‍य प्राप्‍त करण्‍यासाठी व संबंधित तांत्रिक व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी विविध व्‍यावसायिक ट्रेडचे शासन मान्‍यताप्राप्‍त संस्‍थेमार्फत तीन ते सहा महिन्‍यापर्यंतचे प्रशिक्षण मोफत देण्‍यात येते.

प्रशिक्षणाचे प्रकार :
01.  शिवणकला
02.  ब्‍युटीपार्लर
03.  इलेक्‍ट्रीक वायरमन
04.  टर्नर / फिटर
05.  मशीनवर स्‍वेटर विणणे
06.  खेळणी बनविणे
07.  टी.व्‍ही. / रेडियो / टेपरेकॉर्डर मेकॅनिक
08.  संगणक प्रशिक्षण
09.  मोटार वाईन्‍डींग
10.  फेब्रीकेटर / वेल्‍डींग
11.  ऑटोमोबाईल रिपेअरींग ( टु व्‍हीलर, थ्री व्‍हीलर, फोर व्‍हीलर )
12.  वाहनचालक ( मोटार ड्रायव्हिंग )
13.  चर्मोद्योग पादत्राण उत्‍पादन
14.  चर्मोद्योग चर्मवस्‍तू उत्‍पादन

अटी :
1.   अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
2.   अर्जदाराचे शिक्षण हे देण्‍यात येणा-या प्रशिक्षणाकरिता पुरेसे असावे.
3.   अर्जदार 18 ते 40 या वयोगटाचा असावा.
4.   प्रशिक्षण योजनेच्‍या संदर्भात बेरोजगारांना देण्‍यात येणा-या प्रशिक्षण योजनेमध्‍ये कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न शासनाने ठरवून दिल्‍याप्रमाणे दारिद्रय रेषेखाली असावे.
5.   अर्जदार हा महाराष्‍ट्राचा रहिवाशी असावा.
6.   अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असावा.

आवश्‍यक कागदपत्रं :
1.   जातीचा दाखला.
2.   उत्‍पन्‍नाचा दाखला.
3.   नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो.
4.   शिधापत्रिकेची छायाप्रत किंवा निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र.
5.   शाळा सोडल्‍याचा दाखला.
6.   अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असल्‍याचा दाखला व क्रमांक.
 
विद्यावेतन :
मोफत प्रशिक्षणाव्‍यतिरिक्‍त प्रशिक्षणार्थीस दरमहा रु.150 ते 300 पर्यंत विद्यावेतन देण्‍यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा