मंगळवार, १५ मे, २०१२

लातूर मंडळातर्फे नि:शुल्क वधु-वर नोंदणी

वीरशैव कक्कय्या समाज प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने वधु-वर नोंदणीचे कार्य हाती घेण्यात आले आहे. वधु-वर नाव नोंदणी नि:शुल्क होणार आहे. यासाठी इच्छुक वधु-वरांनी आपली सर्व माहिती (नाव, पत्ता, फोन नंबर, जन्मतारीख, उंची, लिंग, शिक्षण, नोकरी, जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ई.) आणि पोस्टकार्ड आकाराच्या फोटो सह मंडळाचे विश्वस्त अॅड. श्री. बाळासाहेब कटके आणि श्री. दिगंबर खरटमोल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. अधिक माहितीसाठी
मंडळांच्या विश्वस्तांना संपर्क करा. त्यांचे संपर्क क्रमांक खाली दिलेले आहेत. १) अॅड. श्री. जांबुवंत सोनकवडे, औसा रोड, लातूर - ०९४२२०७११७२, २) श्री. पंडित कोंडीबा कावळे, हॉटेल आकाश, चैनसुख रोड, लातूर - ०९०४९१५८४००, ३) श्री. दिगंबर विश्वनाथ खरटमोल, श्री बालाजी स्क्रॅप मर्चंट, ग्रेन मार्केट, जुने पावर हाउस, लातूर - ०९४२२६३६५५१. तसेच काही संपर्क क्रमांक ढोर डॉट इन संकेतस्थळाच्या Committees विभागात दिलेले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा