रविवार, २० मे, २०१२

‘लिडकॉम’ची 'बीज भांडवल योजना'

‘लिडकॉम’ (LIDCOM) ची 'बीज भांडवल योजना' ही राज्य पुरस्कृत योजना आहे. या योजनेची आपण माहिती आपण घेवू.

बीज भांडवल योजना

उद्देश :
चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत पारंपारिक व्यवसाय किंवा अन्य व्यवसायासाठी कर्ज पुरवठा केला जातो. चर्मकार समाजातील दारिद्य्र रेषेखालील बेरोजगारास रू.50,000/- ते रु.5,00,000/- पर्यंत कर्ज मिळू शकते. महामंडळ प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 20 टक्‍के बीज कर्ज म्‍हणून
द.सा.द.शे.4 टक्‍के व्‍याजदराने देते व या अर्थसहाय्यापैकी रू.10,000/- रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते.

शैक्षणिक पात्रता : आवश्यकता नाही

वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे.


कौटुंबिक वार्षिक उत्पन्न :
ग्रामीण भागासाठी - रु.39,308 /- आणि शहरी भागासाठी - रु.54,496/-.

कर्जमर्यादा : किमान रू.50,000/- व कमाल रु.5,00,000/-.

बँकेचा सहभाग व व्याजदर :
प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 75% आणि व्‍याज बॅकेच्‍या कर्जावर द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्‍के दराने.

महामंडळाचा सहभाग व व्‍याजदर :
प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 20% आणि व्‍याज 4 टक्‍के द.सा.द.शे. दराने.

अर्जदाराचा सहभाग : प्रकल्‍प गुंतवणुकीच्‍या 5%.

अनुदान : कमाल रू.10,000/-.

हमी : दोन सरकारी नोकरदारांचे हमीपत्र.

तारण : बँकेच्या नियमानुसार.

इतर अटी :
अर्जदार महाराष्‍ट्र राज्‍याचा कायम रहिवाशी असावा.
अर्जदाराने अन्‍य शासकीय संस्‍थांकडून अनुदान घेतलेले नसावे व तो कोणत्‍याही संस्‍थेचा थकबाकीदार नसावा.
अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असावा.
अर्जदाराने सादर केलेला जातीचा व उत्‍पन्‍नाचा दाखला सक्षम अधिका-याने दिलेला असावा.

कर्जाची परतफेड :
परतफेड एक महिन्‍यानंतर 36 ते 60 मासिक समान हप्‍त्‍यात बॅकेस व महामंडळास एकाचवेळी करावयाची आहे.

अर्ज करण्‍याची कार्यपध्‍दती :
कर्ज प्रकरणाच्‍या जलद निपटा-यासाठी अर्जदाराने प्रथम ऑनलाईन अर्ज करणे अपेक्षित आहे. ऑनलाईन अर्जान्‍वये प्राप्‍त झालेला Provisional No. आपल्‍या अर्जात नमूद करुन अर्ज आवश्‍यक त्‍या कागदपत्रांसह नजिकच्‍या महामंडळाच्‍या कार्यालयात सादर करण्‍यात यावा.

आवश्‍यक कागदपत्रं :
1. अर्जदाराचा शैक्षणिक दाखला
2. उत्‍पन्‍नाचा दाखला
3. जातीचा दाखला
4. नुकताच काढलेला पासपोर्ट साईज फोटो
5. शिधापत्रिकेची छायाप्रत
6. व्‍यवसायासाठी लागणा-या स्‍थावर मालमत्‍तेच्‍या किंमतीचे दरपत्रक
7. अर्जदारास ज्‍या ठिकाणी व्‍यवसाय करावयाचा असेल त्‍या जागेच्‍या उपलब्‍धतेचा पुरावा किंवा भाड्याचे करारपत्र
8. अर्जदारास व्‍यवसाय करण्‍यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिकेचा ‘ना-हरकत‘ परवाना अथवा दुकाने अधिनियमाखालील परवाना.
9. प्रकल्‍प अहवाल
10.दोन शासकीय / निम-शासकीय जामिनदार. जामीनदारांच्‍या कार्यालयाचे हमीपत्र, जामिनदारांचे प्रतिक्षापत्र.
11.अर्जदार दारिद्य्र रेषेखालील असल्‍याचा दाखला व क्रमांक.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा