बुधवार, १८ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १० - कु. सोनल सोनकवडे (आयपीएस)

कु. सोनल सोनकवडे या महापारेषणचे मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांची कन्या. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २००६ साली अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांकाने पास होऊन ठाणे येथे उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. त्यांचे २००९ च्या युपीएससी परीक्षेत पास होऊन आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये निवड झाली. पुन्हा २०१० च्या युपीएससी च्या परीक्षेत तसेच मुलाखतीमध्ये निवड होऊन आय पी एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) पदासाठी निवड झाली. तिची आय पी एस साठी निवड होण्याअगोदर 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ती नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

युपीएससी डेडिकेशनची परीक्षा (शब्दांकन: वसुंधरा काशीकर-भागवत)

तुम्ही किती पुस्तकं वाचता यापेक्षा कसं वाचता हे महत्वाचं आहे. युपीएससीमध्ये नेहमीच विश्‍लेषणात्मक (ऍनॅलिटिकल) प्रश्‍न विचारण्यावर भर दिला जातो. त्यामुळे युपीएससी ही आकलनाची परीक्षा आहे. २००९ च्या युपीएससी परीक्षेत चौथ्या प्रयत्नात आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये सिलेक्‍शन झालेली आणि नागपूरमध्ये ट्रेनिंग घेत असलेली सोनल सोनकवडे. बघुयात तिचे अनुभव काय आहेत ते...

प्रेरणा -
हे ऐकून अनेकांना आश्‍चर्य वाटेल पण मी थ्या वर्गात असतानाच ठरवलं होतं की आपण युपीएससीची परीक्षा द्यायची. अर्थात यामागची प्रेरणा माझे वडील आहेत. त्यांना असं मनापासून वाटत होतं की मी आयएएस व्हावं. त्यामुळे थ्या वर्गात असतानाच माझी ध्येय निश्‍चिती झाली होती. १० आणि १२ वीला मी बोर्डात मेरिट होते. पण तरीसुद्धा मी बीएससी गणितात केलं. सर्वसामान्य ट्रेंडप्रमाणे इंजिनिअरिंग किंवा डॉक्‍टरी व्यवसायाकडे वळले नाही. बीएससी करता करता मी बी.ए. राज्यशास्त्रात केलं. आणि ग्रॅज्युएशनला असतानाच तयारी सुरु केली.


पूर्व + मुख्य परीक्षेची तयारी -युपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी माझे इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय होते. युपीएससीच्या परीक्षेसाठी वर्ष पूर्णपणे द्यावे लागतात. भारंभार पुस्तकं वाचण्यापेक्षा मोजकी पुस्तकं वाचून संकल्पना समजावून घेणं महत्वाचं आहे. उदा. राज्यपालाचे अधिकार सांगा. असा सरळ सरळ प्रश्‍न युपीएससीमध्ये विचारण्याची शक्‍यता कमी आहे. याउलट भारतीय राजकारणात राज्यपालाचे पद विवादास्पद राहीलं आहे, या विधानाची साधक-बाधक चर्चा करा. असा प्रश्‍न विचारला जातो. तेव्हा तुमच्या संकल्पना स्पष्ट असतील तर आपोआप उत्तर लिहिताना तुमचा फोकस तयार होतो. रोजचं पेपर वाचन हे खूप आवश्‍यक आहे. कारण त्यातून तुमच्या करंट अफेअर्स किंवा ताज्या घडामोडींवरच्या प्रश्‍नांची तयारी होत असते. तसंच जे विश्‍लेषणात्मक प्रश्‍न विचारतात त्याची तयारी होते. पेपर सोडवणं हे खूपंच महत्वाचं आहे. आपली तयारी त्यामुळे कळते.

बायोडाटाची चांगली तयारी करावी हेच मी सांगेन. आपलं गाव, शहर, ताज्या घडामोडी, छंद यांची चांगली तयारी करावी. इंटरव्हूयत तुम्हाला ऑब्जेक्‍टिव्ह प्रश्‍नांची उत्तरं आली नाहीत तरी चालेल पण ऍनालिटिकल प्रश्‍नांची उत्तरं यायला हवीत. माझ्या एका मित्राला इंटरव्ह्यूत ३०० पैकी २४० मार्कस्‌ मिळालेत. त्याला मुख्य परीक्षेत कमी मार्कस्‌ होते पण इंटरव्ह्यूत चांगले मार्कस्‌ मिळाल्याने त्याचं आयआरएसमध्ये सिलेक्‍शन झालं. म्हणूनच मुलाखतीला दुय्यम लेखून चालणार नाही.

संदर्भ पुस्तकं -1) एनसीइआरटीची वी ते १२ वी पर्यंतची सर्व पुस्तकं- ही पूर्व परीक्षेसाठी खूप उपयोगी पडतात. तसंच युपीएससीचा बेस यामुळे तयार होतो.
2) टाटा मॅकग्राहिलचं जनरल स्टडिजचं पुस्तकं- हे पूर्व + मुख्य परीक्षेसाठी उपयोगी आहे.
इतिहास -1) इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स - बिपीनचंद्र
2) ऍन इन्ट्रोडक्‍शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन - डी.डी.बसू
3) इंडियन पार्लमेंट अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन - सुभाष कश्‍यप राज्यशास्त्र आणि इतिहाससाठी इग्नूची (इंदिरा गांधी मुक्त विदयापीठ) पुस्तकं उपयोगी आहेत.
क्रॉनिकल, इंडिया इयर बुक यांचं वाचनही आवश्‍यक आहे. तसंच स्पेक्‍ट्रमचं सायन्स अँड टेक्‍नॉलाजी हे उपयोगी आहे.

यशाचं सूत्र -
२ वी पास झाल्याबरोबर तयारीला सुरूवात करावी असं मी म्हणेन. त्यासाठी सुरूवात म्हणून एनसीइआरटीची ८ वी ते १२ वीपर्यंतची सर्व पुस्तकं वाचल्यास तुमचा युपीएससीचा पाया चांगला तयार होऊ शकतो. सोबतच रोज पेपर वाचन केल्यास ताज्या घडामोडींची माहिती होते. चांगली मासिकं वाचणं ही महत्वाचं. आपली आवड आणि गती लक्षात घेऊन ग्रॅज्युएशनलाच मुख्य परीक्षेचे विषय पक्के केलेले चांगले. याशिवाय जर का स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश मिळाले नाही तर दुसरा करिअर प्लॅन तयार असणं कधीही चांगलं. शेवटी युपीएससी ही डेडीकेशनची परीक्षा आहे हे विसरता कामा नये.

विशेष -
सोनल पुन्हा २०१० च्या युपीएससीच्या परीक्षेत पास होऊन एप्रिल २०११ ला इंटरव्हयू पण देऊन आलीय. सध्या तीचं आयआरएसमध्ये सिलेक्‍शन झालेलं आहे पण तीचा पहिला प्रेफरन्स आयएएसला आहे. यावेळेस तीचं आयएएस म्हणून सिलेक्‍शन व्हावं यासाठी तीला शुभेच्छा देऊयात.


1 टिप्पणी: