मंगळवार, १० जुलै, २०१२

गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची

श्री. सुखदेव नारायणकर, सांगली यांचा 'गरज संघटनेच्या रचनात्मक मांडणीची' हा लेख 'संत कक्कय्या पत्रिके'च्या 2011 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे. दिवाळी अंकाच्या रूपाने काही लोकांच्या वाचण्यात आलेला हा लेख श्री. विलास व्हटकर यांनी ई-मेलच्या माध्यमातून सार्वत्रिक केला. हा लेख समाजाच्या संघटनात्मक बांधणीचा मसुदा आपल्यापुढे सादर करतो. समाजातील सर्वांनी वाचवा असाच हा लेख आहे. त्यामुळे तो ब्लॉगवर टाकण्याची परवानगी श्री. सुखदेव नारायणकर यांना मागितली आणि त्यांनी ती लगेच दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आता हा लेख कायमस्वरूपी राहील आणि सर्वांना वाचता येईल. लेखावर (टिप्पणी मध्ये) प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. तसेच समाजबांधवांकडून समाजासाठी उपयुक्त लेख आल्यास त्यांचाही लेख त्यांच्या नावासकट या ब्लॉगवर टाकण्यात येईल.

शुक्रवार, १५ जून, २०१२

लातूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

लातूर येथील ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने ढोर समाजाच्या वधु-वरांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे रविवार, 24 जून 2012 रोजी, दुपारी 12:39 वाजता लातूर येथे आयोजन केले आहे. आयोजकांनी आपल्या समाजातील लग्न ठरलेल्या वधु-वरांना या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वधूचे व वराचे वय कमीतकमी अनुक्रमे १८ व २१ वर्षे असले पाहिजे. नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे: जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला आणि

बुधवार, १३ जून, २०१२

दिनोदिन बढता जाये कारोबार - ३

गेल्या ३ महिन्यात कार्यबाहुल्यामुळे जास्त लिखाण होऊ शकले नाही. या दरम्यान लातूर आणि नाशिक मंडळांचे कार्यक्रम, 'लिडकॉम' (LIDCOM) संस्थेची माहिती आणि संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, तसेच संजय सोनवणी यांचा ढोर समाजाबद्दल माहितीपूर्ण लेख ई. ब्लॉग टाकण्यात आले. तरीही वाचकसंख्या टिकून राहिली यातच ब्लॉगचे यश सामावले आहे.

बुधवार, २३ मे, २०१२

ढोर समाजाचा इतिहास

गेल्या ब्लॉग मध्ये संजय सोनवणी यांच्या '......ढोर समाजाचा इतिहास' लेखाबद्दल लिहिले होते. त्यास फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. त्यांच्या या लेखाला कॉमेंट देवून तो लेख माझ्या ब्लॉगवर टाकण्याची परवानगी मागितली होती. ती त्यांनी लगेचच देवून मनाचा मोठेपणा दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचा हा लेख लवकरच 'दैनिक नवशक्ती'मध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या पुढील लिखाणाला हार्दिक शुभेच्छा. तो लेख पुढे दिलेला आहे :


ज्यांच्यशिवाय चालणेही अशक्य झाले असते...ढोर समाजाचा इतिहास
- संजय सोनवणी

हा भारतातील एक अत्यल्पसंख्य समाज आहे. हा समाज मुख्यत: महाराष्ट, कर्नाटक

मंगळवार, २२ मे, २०१२

'संजय सोनवणी' यांचा 'ढोर समाजा'वर माहितीपूर्ण लेख

'संजय सोनवणी' यांचा अल्प परिचय :
मराठीतील आधुनिक काळातील महत्वाचे साहित्यिक. तत्वज्ञ, कवि आणि संशोधक. त्यांनी मानवी जीवनाच्या असंख्य पैलुंना विविध साहित्यप्रकारांद्वारे हात घालत जी साहित्य रचना केली आहे तिला भारतीय साहित्यात तोड नाही. वर्तमानातील सामाजिक प्रश्नांवर सडेतोड भुमिका घेण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. (अधिक वाचा)

संजय सोनवणी हे जून 2010 पासून 'संजय सोनवणी (Sanjay Sonawani)' हा ब्लॉग नियमित लिहितात. यांच्या ब्लॉगवर 10 एप्रिल 2012 रोजी  'ढोर समाजा'वर अतिशय माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. तो समाजातील प्रत्येकाने वाचला पाहिजे असे मला वाटते. त्या लेखाची  लिंक खाली दिली आहे :