सोनल सोनकवडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोनल सोनकवडे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय १० - कु. सोनल सोनकवडे (आयपीएस)

कु. सोनल सोनकवडे या महापारेषणचे मुख्य अभियंता लक्ष्मीदास सोनकवडे यांची कन्या. त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २००६ साली अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांकाने पास होऊन ठाणे येथे उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होत्या. त्यांचे २००९ च्या युपीएससी परीक्षेत पास होऊन आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये निवड झाली. पुन्हा २०१० च्या युपीएससी च्या परीक्षेत तसेच मुलाखतीमध्ये निवड होऊन आय पी एस (इंडियन पोलीस सर्व्हिस) पदासाठी निवड झाली. तिची आय पी एस साठी निवड होण्याअगोदर 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये छापून आलेली मुलाखत येथे जशीच्या तशी देत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना ती नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

युपीएससी डेडिकेशनची परीक्षा (शब्दांकन: वसुंधरा काशीकर-भागवत)

तुम्ही किती पुस्तकं वाचता यापेक्षा कसं वाचता हे महत्वाचं आहे. युपीएससीमध्ये नेहमीच विश्‍लेषणात्मक (ऍनॅलिटिकल) प्रश्‍न विचारण्यावर भर दिला जातो. त्यामुळे युपीएससी ही आकलनाची परीक्षा आहे. २००९ च्या युपीएससी परीक्षेत चौथ्या प्रयत्नात आय आर एस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस) मध्ये सिलेक्‍शन झालेली आणि नागपूरमध्ये ट्रेनिंग घेत असलेली सोनल सोनकवडे. बघुयात तिचे अनुभव काय आहेत ते...