श्री. तायप्पा हरी सोनवणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री. तायप्पा हरी सोनवणे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

कक्कय्या समाज परिचय ११ - श्री. तायप्पा हरी सोनवणे

कै. ताय्यप्पा हरी सोनवणे हे स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे खासदार होत. त्यांचा जीवन परिचय खालील प्रमाणे आहे.
१) कक्कया समाजाचे पहिले वकील व खासदार. 
२) जन्म १० सप्टेंबर १९१० रोजी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील नाझरे या गावी अत्यंत गरीब परिस्थितीत झाला. 
३) लहानपणीच इंग्रजी, फ्रेंच शिकून व रात्रशाळेत शिकून मॅट्रिक झाले. 
४) अर्थशास्त्र व राज्यशास्त्र घेऊन बी. ए. व नंतर नोकरी करत असताना वकील झाले. 
५) मुंबईत वकिली शिकत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कडून कायद्याच्या अभ्यासाचे मार्गदर्शन.