सोमवार, ५ मार्च, २०१२

दिनोदिन बढता जाये कारोबार - २

गेला 'दिनोदिन बढता जाये कारोबार' ब्लॉग लिहून ३ महिने झाले. या ३ महिन्यात बरेच बदल घडले. यादरम्यान श्री. रमाकांत नारायणे यांनी पाठवलेल्या 'कक्कय्या समाज परिचय' ला ब्लॉगवर टप्या-टप्प्याने प्रसिद्धी देण्यात आली. तसेच विविध ठिकाणी होणाऱ्या वधू-वर मेळाव्यांच्या तारखा मंडळांच्या संपर्क क्रमांकासह  ब्लॉगवर देण्यात आले. सर्वच ब्लॉगला समाजबांधवांचा भरभरून प्रतिसाद लाभला. या ३ महिन्यात २७२५ वाचकांनी ब्लॉगला भेटी दिल्या. म्हणजे रोज सरासरी ३० लोक हा ब्लॉग वाचत आहेत. तसेच या ब्लॉगची सदस्य संख्या 
२९ वर जावून पोहोचली आहे. सर्व वाचकांना या ब्लॉगला प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद. पुढेही तुमचे असेच प्रेम या ब्लॉगला लाभूद्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा