शुक्रवार, २ मार्च, २०१२

उचल्यांची 'उचलेगिरी'

वाचकहो,

काही दिवसांपूर्वी माझ्या ब्लॉग वरच्या पूर्वीच्या लेखातले काही शब्दसंच गुगलवर टाकून टाईमपास करत असताना एक लिंकच्या माहितीत माझ्या ब्लॉग वरच्या काही ओळी जशाच्या तशा दिसल्या. कुतूहल म्हणून त्या लिंक उघडून पहिले असता ओळीच नाही तर पूर्ण ब्लॉगच्या ब्लॉग जशेच्या तशे उचलले आहेत. त्यामध्ये फॉन्ट साईझ बदलायची तसदी सुद्धा घेतलेली नाही. नुसती स्टाईलच नाही तर शीर्षकेही जशीच्या तशी उचलली आहेत. हे लिखाण स्वतःचे आहे असे भासवण्यासाठी त्याने ब्लॉग वरच्या माहितीचे डॉक्युमेंट मध्ये रुपांतर करून, त्यावर स्वतःच्या नावाचे लेबल लावून गुगलवर उपलोड केले आहे आणि त्याची डॉक्युमेंटची लिंक स्वतःच्या ब्लॉगवर दिली आहे.

काय बोलायचं कळत नाही असल्या उचल्यांना. अरे, स्वतःची प्रतिभा वापर ना. उधार उसनवारी काय करतो.

साईबाबांसारखे कपडे घालून अनेक साईबाबा म्हणवणारे सभोवती फिरतात, त्यातलाच हा प्रकार आहे.

त्याला (कॉम्पुटरचा पदवीधर असूनही) इंटरनेट (कॉपी-पेस्ट शिवाय) वापरता येत नसावे, नाहीतर इंटरनेटवर  सहजासहजी सापडणाऱ्या गोष्टी माझ्या ब्लॉगवरून चोरल्या नसत्या.

त्या ब्लॉग लेखकाने आजपर्यंत कधीही माझ्याशी ना फोन, ना ई-मेलवर कधी संपर्क साधला. आभार प्रदर्शन तर सोडाच, पण त्याच्या ब्लॉग वरच्या माहितीचे स्त्रोतामध्ये माझ्या ब्लॉगचा साधा उल्लेखही नाही. हा इसम येथे आमचा ब्लॉग वाचतो आणि तिथे स्वतःचा ब्लॉग वाढवतो.

नाही घाटावे लागत। एक शित कळे भात ॥ असे तुकारामाने म्हटले आहे.

ओरिजनल ते ओरिजनल, तोतये ते तोतये. आमच्या वाचकांचा गैरसमज नको, म्हणून हे स्पष्टीकरण.


आपला,
मोतीसागर सोनवणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा