बुधवार, १३ जून, २०१२

दिनोदिन बढता जाये कारोबार - ३

गेल्या ३ महिन्यात कार्यबाहुल्यामुळे जास्त लिखाण होऊ शकले नाही. या दरम्यान लातूर आणि नाशिक मंडळांचे कार्यक्रम, 'लिडकॉम' (LIDCOM) संस्थेची माहिती आणि संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती, तसेच संजय सोनवणी यांचा ढोर समाजाबद्दल माहितीपूर्ण लेख ई. ब्लॉग टाकण्यात आले. तरीही वाचकसंख्या टिकून राहिली यातच ब्लॉगचे यश सामावले आहे.
या ३ महिन्यात २६०४ वाचकांनी (दिनांक १३ जून २०१२ पर्यंत) हा ब्लॉग वाचला. तरीही चर्मकार समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी झटणाऱ्या 'लिडकॉम' संस्थेबद्दलच्या तसेच या संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल लिहिलेल्या  ब्लॉगला फारच कमी प्रतिसाद लाभला याचे सखेद आश्चर्य वाटते. ब्लॉगची सदस्य संख्या २९ वरून ३२ वर जावून पोहोचली आहे. वाचकांना ढोर समाजाबद्दल जास्तीत जास्त माहिती एकाठिकाणी मिळावी या दृष्टीने प्रयत्न करत आहे. ब्लॉगला सतत भेट देत रहा. काहीतरी नवीन तुम्हाला नक्की भेटेल याची खात्री बाळगा. पुढेही असेच तुमचे प्रेम या ब्लॉगला लाभूद्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा