शनिवार, २४ डिसेंबर, २०११

बारामती (जिल्हा - पुणे) येथे वधू-वर मेळाव्याचे आयोजन

श्री संत वीरशैव कक्कय्या (ढोर) समाज विकास मंडळ (अंतर्गत) वधू-वर सूचक समिती, बारामती यांनी रविवार, २५ डिसेंबर २०११ रोजी वसंतराव पवार नाट्यगृह, सांस्कृतिक भवन, सिनेमा रोड, बारामती, जिल्हा - पुणे येथे वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. अधिकच्या माहितीबद्दल श्री. नारायणकर सरांना ०९५४५९९३०२१ या मोबाईल नंबरवर फोन करावा.

बुधवार, २१ डिसेंबर, २०११

वार्षिक स्नेहसंमेलन आणि वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे रविवार, २२ जानेवारी २०१२ रोजी वाशी (नवी मुंबई) येथे आयोजन

वीरशैव कक्कय्या समाज मंडळ, नवी मुंबई यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन आणि वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार, २२ जानेवारी २०१२ रोजी नवी मुंबई हायस्कूल सभागृह, सेक्टर १, वाशी (नवी मुंबई) येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. विवाहेच्छुक मुला-मुलींची नोंदणी नि:शुल्क आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. या कार्यक्रमातच गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील मान्यवरांचा सत्कार होणार आहे. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी मंडळाचे अध्यक्ष श्री. गंगाधर शिंदे ९८२०९६६१६६, कार्याध्यक्ष श्री. पुंडलिक खरटमोल ९८६७६९३५२३, सचिव श्री. माणिक दरवेश ९८२०१८१०२१, खजिनदार श्री. नागेंद्र गायकवाड ९९६९१३०८०९ यांच्याशी संपर्क साधावा.

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - ६ : डॉ. श्री. जयवंत नामदेव व्हटकर

डॉ. श्री. जयवंत नामदेव व्हटकर हे स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक नामदेव व्हटकर यांचे द्वितीय पुत्र होत व हेही लेखक आहेत. डॉ. श्री. जयवंत व्हटकर यांनी लिहिलेली पुस्तके:
०१) जटायू (शासकीय व निमशासकीय कार्यालयातून नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या जीवनावरील काल्पनिक पण रूपकात्मक कादंबरी)
०२) बांडगुळ (कादंबरी)
०३) भौत्याळा (कादंबरी)
०४) माणूस (कादंबरी)
०५) नराधम (कादंबरी)

शनिवार, १७ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - ५ : श्री. यशवंत नामदेव व्हटकर

श्री. यशवंत व्हटकर हे स्वर्गीय आमदार व नामवंत लेखक नामदेव व्हटकर यांचे पुत्र. १९८२ मध्ये ते एम. ए. राज्यशास्त्र झाले. काही काळ ते कोल्हापूरमध्ये राज्यशास्त्राचे अध्यापक होते. १९८३ मध्ये त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यांना आजवरच्या कारकिर्दीत चांगल्या कामगिरीबद्दल १७० प्रशस्तिपत्रे मिळाली आहेत. आज ते मुंबई क्राइम ब्रँच मध्ये सहायक पोलीस आयुक्त या पदावर काम करत आहेत. त्यांनी पोलीस अधिकारी पदावर काम करत असताना आलेल्या अनुभवांवर दोन पुस्तके लिहिली आहेत.

१) 'गुन्हेगारांच्या मागावर' - हा कथासंग्रह म्हणजे अनुभवांची रोचक 'स्टेशन डायरी' आहे. हा कथासंग्रह म्हणजे पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत असताना बऱ्यावाईट अनुभवांच्या केवळ नोंदी नाहीत तर त्यात मानवी स्वभावाच्या अनेकविध पैलूंचे दर्शन येथे घडते.

बुधवार, १४ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - ४ : श्री. गंगाधर यशवंत पोळ

श्री. गंगाधर यशवंत पोळ यांचा जन्म २८-०४-१९०० रोजी मौजे शिरगाव, तालुका चिकोडी, जिल्हा बेळ्गाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात होऊन जिल्ह्यातून हरीजनातून पहिला विद्यार्थी व कक्कय्या समाजातील पहिला मॅट्रिक होण्याचा मान त्यांनी १९२३ साली पटकावला व Deputy Education Inspector या पदावर महाराष्ट्र राज्याची नोकरी १९५५ पर्यंत केली.

श्री. गंगाधर यशवंत पोळ यांची समाजसेवा :
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबर घनिष्ट स्नेह व समाज कार्य.
२) सातारा येथे समाजातील मुले जमवून शिक्षण देण्याचे कार्य.
३) कोल्हापुरात श्री देवी इंदुमती वसतिगृह उभारण्यात मोलाचे कार्य.

मंगळवार, १३ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - ३ : श्री. गणपतराव देवजी तपासे

श्री. गणपतराव देवजी तपासे यांचा जन्म १५ जुलै १९०९ रोजी झाला. ते मुळचे सातारा (महाराष्ट्र) येथले. त्यांचे शालेय शिक्षण अमेरिकन मिशनरी स्कूल येथे झाले. नंतरचे शिक्षण पुण्याच्या फर्गुसन कॉलेज आणि लॉ कॉलेज येथे झाले. त्यांनी तेथे कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. ते १९३८ साली सातारा नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यांच्या राजकीय करियरला सुरुवात झाली. त्याच वर्षी ते सातारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले. त्यांनी १९४० मध्ये सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात भाग घेतला तसेच १९४२ साली झालेल्या 'चाले जाव'च्या आंदोलनात त्यांना १५ महिन्यांची कैदही झाली.

१९४६ आणि १९५२ साली ते मुंबई विधानसभेवर (सध्याची महाराष्ट्र राज्य विधानसभा) निवडून आले आणि मंत्री झाले. त्यांनी समाज कल्याणाचे अनेक निर्णय घेतले. पुढे ३ एप्रिल १९६२ रोजी ते राज्यसभा सदस्य झाले. काही काळ ते रेल्वे सेवा आयोग, मुंबईचे चेअरमन सुद्धा होते.

सोमवार, १२ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - २ : श्री. डॉ. अशोक व्हटकर

डॉ. अशोक व्हटकर हे माजी आमदार नामदेव व्हटकर यांचे सुपुत्र होत. हेही आपल्या समाजात मोठे लेखक होऊन गेले. ते मुळचे कोल्हापूरचे. ते प्राध्यापक व संस्कृत पंडित होते. त्यांनी एकून ४० पुस्तके लिहिली व त्यांना "मेलेले पाणी" या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. ते महाराष्ट्र राज्यात संस्कृत विषयात पीएचडी केलेले पहिले मागासवर्गीय होत. त्यांच्या पुस्तकंची यादी खाली दिली आहे:
०१) ट्रॉयचे युद्ध
०२) मेलेले पाणी
०३) 72 मैल
०४) फॉक्सर

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

कक्कय्या समाज परिचय - १ : श्री. नामदेव व्हटकर

आपल्या समाजात अनेक मान्यवर व्यक्ती होऊन गेल्या व आहेत त्या पैकी एक श्री. नामदेव व्हटकर हे होत. नामदेव व्हटकर हे माजी आमदार होते. ते लेखक व कलावंत ही होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली त्यातील काही विद्यापीठातील अभ्यासक्रमातही लावली गेली. त्यांची अनेक पुस्तके गाजली आहेत. त्यांच्या पुस्तकांची यादी खाली दिलेली आहे:
०१) भारतातील जातीभेद आणि त्यावर उपाय
२) तमाशा
३) डाग
४) आहेर
५) सौभाग्यवती भव
६) नभोवाणीचें लेखन तंत्र
७) वाट चुकली
८) आईशिवाय जलमला
९) झोपाळा
१०) आभिनय : शास्त्र आणि तंत्र
११) चित्रपट रसग्रहण अर्थात सिनेमा कसा पहावा
१२) मराठीचे लोकनाट्य `तमाशा' कला आणि साहीत्य
१३) कथा माझ्या जन्माची (आत्मचरित्र)
१४) मला नट व्हायच आहे
१५) बौध्द धर्मदीप
१६) जगज्जेता
१७) भावफुलोर
१८) दाशराज युध्द
१९) सन्मार्गाने पैसा मिळवण्याची कला
२०) अपराधी
२१) रुपक कथा
२२) सोळा शिणगार
२३) यशवंतराव चव्हाण

त्यांनी 'आहेर' नावाचा चित्रपट १९५७ साली दिग्दर्शित केला होता. त्यात सुलोचनाबाई नटी होत्या. त्यातील एक गाणे खाली देले आहे. ते लता मंगेशकरांनी गायले आहे. ते ऐकायचे असल्यास खालील ओळींवर क्लिक करा.

श्री. रमाकांत नारायणे (रहिमतपूर) यांचा स्तुत्य उपक्रम: 'कक्कय्या समाज परिचय'

श्री. रमाकांत नारायणे (रहिमतपूर) यांनी ईमेल मार्फत 'कक्कय्या समाज परिचय' नावाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम सुरु केलेला आहे. त्यामध्ये समाजाला उपयुक्त अशी माहिती आहे. ही माहिती इंटरनेटच्या महाजालात विखुरलेली आहे. सामान्य माणसाला ही माहिती शोधणे अतिशय कठीण आहे. श्री. नारायणेंनी त्यासाठी निश्चितच कष्ट घेतलेले आहेत. त्यांची ही गोळा केलेली माहिती समाजबांधवांना एकाठिकाणी मिळावी यासाठी ती टप्प्याटप्प्याने या ब्लॉगवर प्रसिद्ध करणार आहे.

ईमेलवर आलेली सर्व माहिती मराठीत नाही. त्याचे मराठीत रुपांतर, क्रमवार माहिती लावणे, इंटरनेटवर अधिकची माहिती शोधणे, स्पेलिंगच्या चुका सुधारणे आणि सर्वात शेवटी सर्व माहिती टाईप करून इंटरनेटवर टाकणे हे अतिशय कठीण काम आहे. ते मी करत आहे. (याबद्दल कोणी माझी स्तुती केल्यास मला नक्कीच आवडेल.)

त्याच बरोबर वाचकांकडेही काही माहिती असल्यास किंवा दिलेल्या माहितीत भर घालायची असल्यास टिप्पणी मध्ये लिहावे.

शनिवार, २४ डिसेंबर २०११ रोजी वधू-वर मेळावा आणि समाज कार्यकर्ता संमेलनाचे वांद्रे (मुंबई) येथे आयोजन

अखिल भारतीय (ढोर) कक्कय्या महासंघ, कुर्ला, मुंबई आणि अखिल भारतीय वीरशैव कक्कय्या समाज संस्था, कुर्ला, मुंबई यांच्या सहयोगाने सालाबादप्रमाणे वधू-वर मेळावा आणि समाज कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन शनिवार, २४ डिसेंबर २०११ रोजी समाज मंदिर हॉल, खेरवाडी पोलीस स्थानकाच्या समोर, वांद्रे, मुंबई - ४०००५१ येथे करण्यात आले आहे. सर्व विवाहेच्छुक मुला-मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी श्री. व्यंकटराव शिंदे ०२२-२०६३११००, श्री. राम कटके ९७६८९६०७५५, श्री. साधू कटके ९८१९७९९६२८ यांच्याशी संपर्क साधावा. या संस्थांच्या इतर विश्वास्थानांही संपर्क करू शकता. त्यांचे फोन नंबर www.dhor.in संकेतस्थळाच्या Committees विभागात दिले आहेत.

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

दिनोदिन बढता जाये कारोबार

समाजाचे इंटरनेटवरील अस्तित्व, समाजाप्रती भावना व्यक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि नवीन काहीतरी शिकण्याची ओढ या मिश्रणातून या ब्लॉगची निर्मिती झाली. हा ब्लॉग सुरु होयीपर्यंत गुगलच्या मराठी शोध यंत्रावर (search engine) वर ढोर आणि ढोर समाज (मराठीत) टाईप होत नव्हते. या ब्लॉगच्या वाढणाऱ्या लोकप्रियतेबरोबर ते शब्द गुगलवर येऊ लागले. (गुगलच्या मराठी शोध यंत्रावर जाऊन संगणकाच्या कळयंत्रावर dhor किंवा dhor samaj असे इंग्रजीत टाकल्यास त्याचे मराठीत आपोआप रुपांतर होते). तरीही अजून 'कक्कय्या' हा शब्द अजूनही गुगल शोध यंत्रावर येत नाही. कारण त्याचा आंतर्जालातील संदर्भ आणि या शब्दाचा शोध घेणारे वाचक नाहीच्या बरोबर आहेत. येणाऱ्या काळात तीही कमी भासणार नाही याची खात्री वाटते. कारण हा