शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०११

'संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान'ला हार्दिक शुभेच्छा !!!

गरीब, होतकरू आणि आर्थिक दुर्बल विद्यर्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या 'संत कक्कय्या विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठान'च्या मुंबई कार्यालयाचे गुरुवार, दिनांक २०/१०/२०११ रोजी उद्घाटन झाले. दोन दिवस आधी अध्यक्ष श्री. सोनकवडेंनी समाजातील प्रतिष्ठित लोकांना sms करून यायचे निमंत्रण पाठवले होते. उद्घाटनाला उपस्थित राहिलेल्या समाज बांधवात माजी आमदार डॉ. श्रीमती प्रभा गंगाधर शिंदे, माजी आमदार श्री. धर्माजी गिर्जाप्पा सोनकवडे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती रुक्मिणी विठ्ठलराव खरटमल, त्यांचे पती आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री. विठ्ठलराव अंबाजी खरटमल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते श्री. महेश भारत तपासे, वाशी (नवी मुंबई) समाज मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. पुंडलिक अंबाजी खरटमल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त श्री. शांताराम शामराव शिंदे, वीरशैव संत कक्कय्या युवा ट्रस्ट (कुर्ला) चे अध्यक्ष

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

पत्रावर आलेल्या प्रतिक्रिया

माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रावर अद्याप कोणत्याही मंडळाची लेखी प्रतिक्रिया आली नसली तरी काहीजणांचे फोन मात्र येऊन गेले. पत्रात माझ्याच मोबाईलचा उल्लेख असल्याने मीच सर्व फोन घेतले. या सर्वांशी जवळपास एकसारखाच संवाद झाला. परंतु अहमदनगर जिल्हा ढोर (वीरशैव कक्कय्या) समाज कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कटके यांची प्रतिक्रिया काहीशी वेगळी आणि सुखावणारी होती:

मी : हॅलो.
श्री. कटके : मधुकर सोनवणे बोलत आहेत का?