शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०११

पत्र लिहिण्यामागचा उद्देश

परवा लिहिलेल्या ब्लॉगवरील पत्राचा उद्देश केवळ मंडळांची प्रसिद्धी, वधू-वर पुस्तिकेचा खर्च वाचवणे किंवा घरबसल्या वधू-वर यादी पाहता येणे यापुरताच मर्यादित नाही तर समाजाचा पैसा विधायक कार्यासाठी वळवणे हा आहे.

आज कितीतरी समाजबांधव शिक्षणाविना, मार्गदर्शनाअभावी योग्य प्रकारचे शिक्षण घेऊ शकत नाहीत की योग्य व्यवसाय निवडू शकत नाही. जगात घडणाऱ्या विविध संधींचा फायदा अजूनही आपला समाज घेऊ शकत नाही किंबहुना आपण या संधी शोधूच शकत नाही असे म्हणणे योग्य होईल. कारण काहीही असो त्या खोलात मला आता जायचे नाही. पण यापुढेही आपण असेच झापड लावून जगणार आहोत का? कित्येक शासकीय आणि खाजगी संस्था आर्थिक दुर्बल, पिचलेल्या समाजाला उभारी देण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत, याची आपल्याला साधी जाणीवही नाही. आजही मी, माझे कुटुंब

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

वधु-वर मेळावे घेणाऱ्या मंडळांना लिहिलेले एक पत्र

माझे वडील डॉ. श्री. मधुकर मारुती सोनवणे यांनी वधु-वर मेळावे घेणाऱ्या ८-९ मंडळांना ७ मे २०११ रोजी लिहिलेले एक पत्र.


विषय : मंडळाची माहिती इंटरनेटवर टाकणे बाबत.


माननीय महोदय,

गेली अनेक वर्षे आपले मंडळ वधु-वर मेळाव्यांच्या माध्यमातून समाज जोडण्याचे काम उत्तमरीत्या करीत आहात, हे पाहून आनंद होत आहे. आपल्या या समाजकार्याला माझा थोडाफार हातभार लागावा या हेतूने हा पत्रव्यवहार करत आहे.

सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

अशी माहिती टाका.

या ब्लॉगवर आपणास काही माहिती टाकावयाची असल्यास ती स्वत: टिप्पणी मध्ये  टाकावी किंवा मला ई-मेलवर कळवावी. ती माहिती लेखकाच्या नावासह येथे पोस्ट करण्यात येईल. लेखकाने माहिती मराठी, हिंदी अथवा इंग्रजीमध्ये लिहून पाठवावी. मराठी आणि हिंदी  लिहिण्यासाठी गुगल ट्रान्सलिटरेट (www.google.com/transliterate) वापरा आणि यात कॉपी पेस्ट करा.

अस्तित्वाची लढाई !!!

शीर्षक वाचून आश्चर्यचकित झालात ना. मनात आलेच असेल, 'ही कसली लढाई?' ही आहे आपल्या इंटरनेटवरील अस्तित्वाची. होय, आपल्या समाजाचे इंटरनेटवरील अस्तित्व फारच थोडे आहे. गुगल सारख्या सर्चइंजीनवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी मध्ये ढोर समाज (dhor samaj), अशी अक्षरे टाकल्यावर कोणत्यातरी संस्थेचे, संकेतस्थळाचे, काही व्यक्तींचे अथवा सोशल नेटवर्क साईट मधील ग्रुपचे नाव पुढ्यात सादर होते. परंतु ढोर समाजाबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. ही खरेच खेदाची बाब आहे. मग एक अनाहूत विचार मनात येतोच, 'याच्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. ही माहिती इंटरनेटवर टाकल्याचा काय उपयोग होणार?' हेही खरेच की, जोपर्यंत कोणतीही गरज नसते किंवा उपयोग नसतो तोपर्यंत आपले लोक काहीही करत नाही. एकमेकांना साधा फोनही करत नाहीत. 'आपल्या लोकांना दोनवेळचे खायची मारामार, या गोष्टी कोण करत बसणार.